जीवन,जन्म – मृत्युच्या दरम्यानचा काळ.. – भाग – ६…

         71 ते 80 या वर्षाच्या वयात प्रत्येकजण जर सुसंस्कारीतरित्या 70 वर्षापर्यंत ( मागे सांगितलेल्या पोस्टमधील सम्यक मार्गाने ) जगत आलेला असेल तर या काळात तो एक मानसिक परिपक्व आणि आत्मविश्वासाने ठासून भरलेल्या व्यक्तिमताचा एक..

आदर्श नागरिक बनलेला असतो…

  त्याला दुःख, दारिद्र्याच्या माऱ्याची भीती जवळ फडकत सुद्धा नसते.विज्ञानवाद, विवेकवाद म्हणजेच मानवतावादाचा जिवंत पुतळा तो असतो. जगातील सर्व समस्याचे निराकरण त्याच्या जवळ असते. त्याच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आणि त्याच्या हातून घडणारी प्रत्येक कृती देशाला व समाजाला सम्यक मार्गाने घेऊन जाणारे त्याचे प्रत्येक पाऊल असते..

       जगातील कुटनीती त्याच्यापासून अदृश्य झालेली असते.जगातील प्रत्येक तत्ववेत्ता व महापुरुष त्याचा आदर्श असतात.त्याचा शब्द कुणीही खाली पडूच देत नाहीत. अवघे विश्वची माझे घर या न्यायाने तो या वयात जगत असतो.त्याला मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्य सुद्धा लाभलेले असते ( जरी शरीर कमजोर झालेले असले तरी )..

        या काळातील त्याची प्रत्येक कृती ही जगाला आदर्शवत असते.एवढेच काय या सम्यक मार्गाने आजपर्यंत कोणत्याही काळात (वयाच्या 80 वर्षापर्यंत ) केलेली प्रत्येक कृती ही समाजाला,देशाला आदर्शवतच असते. कारण तो निसर्गाला संपूर्णपणे समजून घेऊन ( विज्ञान आणि विवेकाने ) माणूस बनलेला असतो. एकवेळ देव आणि राक्षस बनणे अगदी सोपे आहे,पण माणूस बनणे महाकठीण आहे.हे तो अनुभवातून जाणल्यामुळे तो महाकठीण जरी असला तरी अशक्य नाही हे तो सिद्ध करतो… 

       त्याच्याकडे जगातील सर्व समस्यांचे उपाय असल्यामुळे त्या निराकरणाकडे जगाला घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करतो.एक आदर्श जबाबदार जगाचा नागरिक म्हणून तो सिद्ध होतो.हीच तर अपेक्षा सर्वच महापुरुषांनी आपल्याकडून केलेली असते.याव्यतिरिक्त त्यांना काहीही अपेक्षित नसते.यासाठीच तर ते त्याचे आयुष्य खर्ची केलेले असते,वादळ वाऱ्याशी झुंज देऊन..

          परंतू ,या 71 ते 80 वयाच्या काळातील आजचा 2024 मधला भारतीय नागरिक मात्र गेली 70 वर्षे सम्यक मार्गाने जीवन जगत आलेला नसल्याने ( याला अपवाद असणाऱ्यांना माझा सॅल्यूट…) या वयात तो स्मृती गमावलेला, शारीरिक व्याधीनी ग्रासलेला, परिवाराला जड झालेला, वृद्धाश्रमात मरणाची वाट पाहणारा,( भरपूर पेन्शन असेल तर एक तारखेला कुटुंबाकडून अती सुख जाणवणारा उर्वरित दिवस दुःखात काढणारा,किंवा पेन्शच्या लालसेपोटी शारीरिक सुख कुटुंबाकडून उपभोगणारा मात्र मानसिक दुःख झेलणारा ) पृथ्वीला सुद्धा डोईजड झालेला असतो….!

            जीवनात त्याने कुटनीतीच्या मार्गाने माया ( भौतिक ) जमविलेली असेल,आणि त्याच्या बळावर तो या काळात सुखी जीवन जगण्याचे स्वप्न पाहत असेल तर या वयात जेव्हा तो पोहचतो.तेंव्हा त्याच्या मिथ्या आपोआपच गळून पडतात.कारण केलेली कल्पना या ठिकाणी फोल ठरलेली असते.!

         या वयात एवढ्या मानसिक दुःखाच्या गराड्यात सापडलेला असतो की तो कुणाला सांगुही शकत नाही, त्यावर उपायही या जगात कुठेही नसतो.केवळ भोगणे हाच पर्याय उरतो.म्हणून या जगातून जाण्यासाठी नैसर्गिक मार्गाची वाट पाहतो.पण ती वाटही भेटत नाही.

       अशा काळात त्याची थोडीशी जरी विवेकशक्ती जागृत होत असली तर ती त्याला एवढीच आठवण करून देती की तू ,जेंव्हा तुझ्या भूतकाळात मागे वळून पाहशील आणि जे जगलास त्याकडे पाहशील तर तुझी तुलाच तरी निदान लाज वाटून पश्चाताप झाला तरी बस झाले.

       काहीतरी उर्वरित आयुष्य सुखाचे जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल..

     अन्यथा,आया है नंगा,जायेगा भी नंगा.खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा बारा आणा……

“तू लाख हिफाजत कर ले,लाख करे रखवाली,”उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली……

   भावपुर्ण श्रद्धांजली!”कधीही अर्पूण घ्यावी…

          जागृतीचा लेखक 

           अनंत केरबाजी भवरे 

    संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…