कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :-पारशिवनी तालुक्यातील खापरखेडा रोडवरील दिगलवाडी शिवारातील सुर्या पेट्रोल पपं जवळ उद्या रोज बुधवारला रामटेक विधानसभा क्षेत्रातंर्गत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या टिफीन व संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती व रामटेक विधानसभा प्रचार प्रमुख यांनी कळविले आहे.
याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,डॉ.राजीव पोतदार,माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी,अरविंद गजभिये जिल्हा भाजप अध्यक्ष,अविनाश खडतकर सह क्षेत्रातील विभिन्न आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी सरकारचा नऊ वर्षे पूर्ण झाली. त्याच्या कार्यकाळात त्यांनी लोकांच्या भावना ओळखुन केलेल्या वैशिष्ट्ये पुर्ण योजना व कामाचा लेखाजोगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल या हेतूने आयोजित टिफीन बैठक व संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व कार्यकर्ते यांनी आपला जेवणाचा टिफीन घरूनच आणण्याचे आव्हान सुधाकर मेंघर यांनी केले आहे.