रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी
कर्मयोगी संत गाडगेबाबांचे अंतिम श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नागरवाडी येथे, ना.बच्चु कडू यांच्या हस्ते अहोरात्र प्रामाणिक सेवा बजाविणाऱ्या, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच दिव्यांग महिला व समाजसेवकांना भव्य दिव्य सत्कारा सोहळा या ठिकाणी पार पडला.
प्रामुख्याने नागरवाडी संस्थेचे संचालक बापुसाहेब देशमुख व दानवीर नितीन दळवी यांच्या संकल्पनेतून, आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहुन सेवा देणार्या पोलीस बाधंवाच्या सेवची खऱ्या अर्थाने दखल घेत, सेवेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस बांधव व समाजसेकांना सुंदर खादीचे शर्ट पिस,टॉवेल, मिठाई इत्यादी साहित्य भेट स्वरुपात त्यांना यावेळी देण्यात आले.
दरम्यान गोरगरीब दिव्यांगाचे आधार असलेले ना.बच्चुभाऊ कडू यांना महाराष्ट्र शासनकडून दिव्यांग विभागाचे अध्यक्ष तथा मंत्री पदाचा दर्जा मिळाल्या बद्दल संचालक बापुसाहेब देशमुख यांनी श्री गाडगे महाराज संस्थेतर्फे शाल,श्रीफळ व पुष्पवर्षाव करीत त्यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला.
तसेच नागरवाडी येथे गेल्या 2 महिण्यापासुन मेळघाटमधील आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार मुलांकरीता आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणातून, टू-व्हीलर मोटार मेकॅनिकल,मोटार वाईडिंग,ब्युटीपार्लर,कुकींग यामध्ये सहभाग घेवून यशस्वीरीत्या प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ना.बच्चु कडू यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला मंगेश देशमुख ( संचालक कृ.उ.बा,समिता चांदुरबाजार) माजी पोलीस अधिकारी रणजीतराव देशमुख,सुर्यकांत देशमुख,नाशिक धर्मशाळेचे संचालक कुणाल देशमुख,साठे साहेब,प्रहारचे सुनिल मोहोड,प्रफुल नवघरे,समाजसेवक रमेश तोटे आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सत्कार सोहळ्याला उपस्थित मान्यवरांचे संचालक सागर देशमुख यांनी आभार मानले. यानंतर उपस्थित सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.