बसपाचा संघटन समीक्षा कार्यकर्ता मेळावा आज चंद्रपूरला… — प्रदेश प्रभारी भिमजी राजभर,प्रदेशाध्यक्ष अॅड.संदिप ताजणे करणार मार्गदर्शन…

 

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका

        बहुजन समाज पार्टी द्वारा आज चंद्रपूर येथे संघटन समीक्षा या विषयाला अनुसरून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तद्वतच या मेळाव्यात जिल्हा परिषद,नगरपरिषद,पंचायत समिती निवडणूक संबधाने मार्गदर्शनातंर्गत माहिती दिली जाणार आहे.

       कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी भिमजी राजभर असणार आहेत तर मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अॅड.संदीप ताजणे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

       याचबरोबर विशेष मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अॅड.सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुशिल वासनिक,नवानंद खंडाळे,चंद्रकांत मांझी,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मुकद्दर मेश्राम हे सुद्धा आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

          “एकलव्य सभागृह,(रेंजर काॅलेज जवळ मुल रोड)चंद्रपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी साडेबारा वाजता नंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

        तत्पूर्वी डोणाळा येथील संजय खोब्रागडे व त्यांचा संच प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम १२ वाजता प्रारंभ करणार आहेत.

      चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बसपा पदाधिकारी व कार्यकर्तागण आज होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.