टेकाडी येथे नवं संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. 

 

      कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- टेकाडी गावातील इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन नवं संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज करण्यात आले होते. 

       या सत्कार समारोह प्रसगी टेकाडी गावातील कुमारी मनस्वी विशाधरजी कांबळे ही 82.20% घेऊन उत्तीर्ण तर कु.रोशनी शंकरजी बेलखोडे,हिने इयत्ता दहावी मध्ये 81.40% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेली आहे.

      प्रावीन्य प्राप्त विद्यार्थीनिंचा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या मा.सौ.रश्मीताई बर्वे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेलं मोमेंट देऊन सत्कार करण्यात आला.

       डॉ.बाबासाहेबांचा आदर्श पुढे ठेवून शिक्षण अर्जित करण्याचे मार्गदर्शन सौ.रश्मीताई बर्वे यांनी केले,दोन्ही उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

        याप्रसंगी विद्यमान जिल्हा परिषद सदस्या मा.सौ.रश्मीताई बर्वे,माजी सभापती सौ.मीनाताई कावळे,पचायत समितीच्या उपसभापती कुमारी करुणाताई भोवते,ग्राम पंचायत टेकाडीचे सदस्य तथा नवं संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख सतिश भाऊ घारड,सौ.निशाताई कांबळे,श्री.अशोकरावजी राऊत,श्री.प्रवीण भाऊ चव्हाण,श्री.विशाधरजी कांबळे,श्री.शंकर रावजी बेलखोडे,कुमार आशिष कडू,कुमार दुष्यंत राऊत,कुमार आकाश कडू व ग्रा पचे सदस्य उपस्थित होते.

     सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रस्ताविक तथा संचालन ग्रा.पं. सदस्य सतिशभाऊ घारड यांनी केले.