CBSEबोर्डाच्या १० वी च्या परिक्षेत हनिया ने घेतली उच्च भरारी… 

      राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         कुरखेडा येथील व्यापारी मुजफ्फर बारी यांची नात हनिया इकबाल खान हिने CBSE बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेत ८५.०८टक्के गुण घेऊन शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. हनिया ही मुळ वणी येथील रहिवासी असुन तिचे वडील इकबाल खान ईंजिनीयरींग वर्कशॉपचा व्यवसाय करतात.

           अल्पसंख्याक समाजाची असुन ही शिक्षणाची गोडी असणार्या हनिया हिला तीच्या पालकांनी CBSE बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तिचं ऍडमिशन केलं होत.लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी व अभ्यासाच्या जिद्दीने तीने दहावीच्या परिक्षेत उंच भरारी घेतली आहे.

             तिने आपल्या यशाचे श्रेय आपले आजोबा मुजफ्फर बारी व आई वडील व शिक्षक वृंदाना दिले आहे.हनिया व तिचे पालक हज यात्रेला जाणार असल्याचे तिने प्रतिनिधी सोबत बोलतानी सांगितले.