ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घातले होते अशातच मोठ्या प्रमाणात उन्हाळी शेत पिकाचे नुकसान झाल्याचे वास्तव समोर आले होते. अशातच शासकीय खरेदी केंद्रावरून मका खरेदी सुरु करण्यात न आल्याने शेतकऱ्यांतुन असंतोष खदखदु लागला होता. ही गंभीर बाब लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी रवींद्रजी चव्हाण अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचेकडे पाठपुरावा करून यथाशिघ्र मका खरेदी करण्या संदर्भात पाठपुरावा केला असता अखेर ४ मे पासुन मका खरेदी संदर्भात राज्य शासनाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याने मका खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत पणन हंगाम २०२२-२३ मध्ये भरडधान्य खरेदी कार्यान्वित करणे,खरेदीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी करणे व अभिकर्ता संस्थांना खरेदीचे उद्दिष्ट नेमून देण्या संदर्भात अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने ३ मे २०२३ रोजीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशीत करण्यात आले आहे.
दरम्यान किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने पणन हंगाम २०२२-२३ रब्बीसाठी निश्चित केलेल्या खरेदी कालावधीत भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी होणाऱ्या शेतकऱ्यांचे तत्काळ शेड्युलिंग करून खरेदी प्रक्रिया पुर्ण करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व भरडधान्य खरेदीचा तपशील शासनास वेळोवेळी सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाचे कक्ष अधिकारी विजय मोरे यांच्या स्वाक्षरीनिशी पञ जारी करण्यात आले आहे. यासाठी आमदार गजबे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याने शेतकरी वर्गातून आमदार गजबे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
आज कुरखेडा येथे शासकीय धान्य गोडाऊन मध्ये मका खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावात खरेदी केंद्रावर मका विक्री करावी असे आव्हान आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
यावेळी तहसीलदार राजकुमार धनबाते , नायब तहसीलदार चोकोले, एस आर एम बावने, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चांगदेव फाये, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, भाजपा शहराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, भाजपा तालुका महामंत्री एड.उमेश वालदे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद खुणे, , प्रा.विनोद नागपूरकर, प्रशांत हटवार, आविका कुरखेडा अध्यक्ष बाबुराव तुलावी, संचालक नानाजी वालदे, लीलाधर घोसेकर, कपिल तुलावी व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.