निरा नरसिंहपुर दिनांक: 20
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
गिरवी तालुका इंदापूर या ग्रामीण भागातील प्रगतीशील शेतकरी यांनी एकरी 35 ते 40 क्विंटल मकेचे विक्रमी पीक उत्पन्न काढले.
अरविंद डिसले या शेतकऱ्याची प्रगतशील बागायतदार म्हणून ओळख या परिसरात आहे. ऊस, केळी, डाळिंब, मिरची, कलिंगड, काकडी,खरबूज, यासारख्या पिकांची शेती अतिशय चांगल्या प्रकारे पिके नेहमीच शेतामध्ये पिकवत आसत. चालू सीझनमध्ये उन्हाळी मक्याचे पीक जोमात उत्पन्न काढले, पी 35 24 मक्याची व्हरायटी या जातीची आसून तीन एकर दहा गुंठे क्षेत्रामध्ये 120 क्विंटल मका पीक घेतले. शेतकरी अरविंद डीसले बोलत आसताना म्हणाले की मी गेली आनेक वर्षापासून मकेची पिके नेहमीच घेत आसतो. उसामध्ये जोडपीत तसेच माड्या शेतामध्ये मक्याचे पीक, मी करीत आसतो अंतर पिकामध्ये मक्याचे उत्पन्न एकरी 25 किमान तर माडे पीक लागवडीमध्ये व सरी पद्धतीवर 35 ते 40 क्विंटल इतके मी इथून पाठीमागे उत्पन्न काढले आहे. परंतु शेत मालातील पिके चांगल्या पद्धतीने पिकवीत आसतो परंतु एवढे उत्पन्न काढून सुद्धा पीकवलेल्या मालाला शासना कडुन हमीभाव मिळत नाही. उत्पन्नातील सर्वच पिकांना शासनाने हमीभाव द्यावा गिरवी येथील प्रगतशील शेतकरी आरविंद डिसले या नावाची ओळख आसून 21 एकर क्षेत्र या शेतकऱ्याला आहे. कष्टाच्या जोरावर चांगल्या पद्धतीने शेतामध्ये पिकांची उत्पन्न घेत आहे.