बळवंत वानखडेंचा स्टॅम्प पेपरवरील शपथनामा चर्चेत… — पुन्हा एकदा जिंकला जनतेचा विश्वास.. — शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपर वर लिहून दिला शपथनामा…

अबोदनगो सुभाष चव्हाण

  अमरावती जिल्हा प्रतिनिधी

           दखल न्युज भारत 

अमरावती :- लोकसभा निवडणुकीला सामोरे जातांना महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रामाणीकतेचा परिचय विविध कार्यातून पुढे येत आहे अश्यातच त्यांनी जनतेची कोणकोणती कामे आपण करणार आहोत याचा शपथनामा चक्क शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर लिहून जनतेसमोर ठेवला आहे त्यामुळे बोले तैसा चाले याची प्रचिती जनतेला आली असून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्तृत्वातून जनतेचा विश्वास जिंकला आहे.

           Bशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवून शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी कटिबद्ध राहील, शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते, संत्राफळांच्या प्रक्रिया केंद्राची निमिर्तीसाठी पुढाकार घेऊन ५० हजार लोकांना रोजगार देण्यासाठी कटिबद्ध असेल, जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये ७० टक्के स्थानिकांना रोजगार मिळवून देणार,प्रत्येक तालुक्यात डिजिटल लायब्ररी उभारणार, महिलांना शहरात मोफत बस सेवा तसेच प्रत्येक तालुक्यात फिरते आरोग्य केंद्र उभारण्यात येणार, मूळ निवासी असलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर होणारे अनधिकृत अतिक्रम रोखून त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार मिळवून देणार असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे.

          अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी ३७ उमेदवार रिंगणात उभे आहेत.अनेकांनी मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी आश्वासनांची खैरात वाटत आहे. या सर्व उमेदवारांना अपवाद ठरले ते बळवंत वानखडे. कोणत्याही आश्वासनांचे आमिष न दाखवता त्यांनी चक्क जनतेसाठी जे काम करणार त्याबाबतचा लेखी शपथनामाच लिहून दिला आहे.जी कामे करणार आहेत ती चक्क स्टॅम्पपेपर वर लिहुन जनतेसमोर सादर करण्याचे धाडस बळवंत वानखडे यांनी दाखविल्यामुळे त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

           अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये काट्याची टक्कर होईल असे वाटत होते मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना चौफेर पाठिंबा मिळत असल्याने त्यांची विजयकडे घौडदौड सुरु आहे.