सुनिल गेडाम
तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
सिंदेवाही :: गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राची निवडणूक झाली असून उमेदवार वारंचे भाग्य मशीन मध्ये बंद झाले, मतदाराचा कौल बघता गडचिरोली चिमुर क्षेत्रात जास्तीत जास्त मतदान झाले.
अश्यातच लाडबोरी मधील विश्वनाथ नगराळे (महाराज) यांनी भविष्यवानी केली की या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान हे भारी भरगोस मताने निवडून येणार आहेत आणि त्यांनी आपल्या पंचाग व अभ्यासाच्या जोरावर भाकीत केल आहे.आत्ता मतदार राजाचा कौल हा निकालाच्या दिवशी दिसून येईल.
कोण आहेत विश्वनाथ नगराळे
मौजा लाडबोरी येथील रहिवासी असून ते लोंकाचे भविष्य बघत असतात व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाचा प्रचंड प्रभाव असून दरवर्षी गोंडोदा यात्रेला न चुकता जातात त्यांनी आज पर्यंत केलेलं भाकीत खर सुद्धा होऊन जात, आज त्यांनी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकी बाबत भविष्यवाणी केली आहे.