रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे व्य्कती नाही तर जागतिक प्रेरनादायी विचार आहेत.बासाहेबांनी संपुर्ण आयुष्यात समाजीक समतेसाठी संघर्ष केला.ज्या देशानी मानवी विषमतेचा संघर्ष अनुभवला त्या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मानवमुक्तीचा व समतेचा विचार जगाने स्विकारला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अनेक पैलूनी युक्त असले तरी त्यांच्या विचाराचा समान धागा आर्थिक होता.युगपूरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बॅरिस्टर पदवी वगळता इतर सर्व पदव्या अर्थविषयक आहेत.भारतीय रुपयाचा प्रश्न,उगम आणि उपाय हा ग्रंथ आम्हाला पुर्ण समजला असा दावा जगातिल कुठलेही अर्थतज्ञ करु शकणार नाही,म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातिल सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ असल्याचे असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सशोधंन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी व्यक्त केले.
तथागत युवामंडळ बोडधा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ.आंबेडकर व त्यांचे आर्थिक विचार याविषयावर मार्गदर्शन करत असताना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू कापसे माजी प.समिती सदस्य चिमूर,प्रमुख पाहुणे स्वप्निल मालके माजी उपसभापती प.स.चिमूर,प्रमुख मार्गदर्शक बार्टीच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे,समाज प्रबोधनकर्ता तथा समाज सेवक प्रकाश मेश्राम अध्यक्ष मुकनायक फाउडेशन,सौ.भावनाताई बावनकर माजी प.स. सदस्य,सौ.गिताताई नन्नावरे माजी जिल्हा परिषद सदस्य,सौ.रौशनी बारसागडे ग्रा.पंचायत बोडधा सरपंच,सौ.प्रतिभाताई दिडमूडे उपसरपंच बोडधा,श्री.प्रमोद सहारे तंटामुक्त समितीअध्यक्ष बोडधा,प्रफुल बरधे पोलिस पटील बोडधा,आदी मान्यवर उपस्थित होते.
सविस्तर मार्गदर्शनातंर्गत समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या आज जी संसदिय लोकशाही टिकून आहे हे फक्त भारतीय सविधानामुळे आहे.देशात विषमता राहू नये असे मजबूत सविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिले.बाबासाहेब यांच्या अर्थविचाराचे मर्यादिकरण केले जात आहे,वंचित पिडीत शोषणमुक्त समाजाचा पाया उभा राहन्यासाठीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थविचार आचरणात आणून तळागाळापर्यंत पोहचविन्याची जबाबदारी सर्वाची आहे.
देशाला समोर ठेवुन डॉ. आंबेडकरानी अर्थशास्त्रीय लेखन केले,देश आर्थिक प्रगती करित असला तरी आज गरिबी मोठे आव्हान समोर आहे.आर्थिक विषमता कमी झाली तर जातिय भेदभावाची दरी कमी होईल,देशाची सगळी संसाधने लोकांच्या हितासाठी वापरली गेली पाहिजेत.देशातील सर्व संसाधनावर लोकांना समान अधिकार मिळेल असे आर्थिक धोरण राज्यघटनेचे अविभाज्य भाग असले पाहिजे.
मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण करणे,राष्ट्रीय उत्पादनात वाढ होणे,त्यातून रोजगानिर्मीती असे वंचिताच्या जगन्याचे विचार करणारी समाजीक अर्थव्यवस्था डॉ. आंबेडकर यांना अभीप्रेत होती.त्यामूळे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेची महासत्ता बनायेचे असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक वीचारानेच बनेल.
देशातील प्रतेक नागरिकानी आर्थिक सिधांतासाठी आग्रही राहणे गरजचे आहे,नव्या पिढीमध्ये बाबासाहेब यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सकारात्मक भूमिका घेण्याची क्षमता आहे,आर्थिक सक्षमता,आत्मनिर्भता ही चळवळ आपण ज्या समाजातुन येतो तेथील समाजाला संघटीत करुण विहार तेथे वाचनालय,आर्थिक बचत बँकची स्थापना करावी हेच खरे डॉ.बबासाहेब आंबेडकर यांना अभीवादन राहिल असे सविस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.
महाराष्ट्रतील तडपदार गायक दिनेश भारती नागपुर यांच्या भिम कव्वालीचे उद्घाटन व त्यांचा सत्कार समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.तथागत युवामंडळ तर्फे सविधान देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन शंकर रामटेके यांनी केले तर आभार दिगंबर बारसागडे यांनी मानले.