खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात… — राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजप-शिवसेना एकत्र…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवार (दि.२०) एप्रिल या अखेरच्या शेवटच्या दिवशी सोसायटीची मतदार संघातील १८ जागासाठी ३९ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असुन १०० उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा जुन्नर तालुका सहकार सहाय्यक निबंधक संजय सरसमकर यांनी दिली.

कृषी पतसंस्था व बहुउदेशीय सहकारी संस्था सदस्य मतदार संघातील सर्वसाधारण गटातुन जयसिंग सोपान भोगाडे, राजाराम रघुनाथ लोखंडे,लिंभोरे कैलास शंकरराव,विलास रामचंद्र कातोरे,नवनाथ लक्ष्मण होले, अनुराग संजय जैद,सोमनाथ विठ्ठल मुंगसे,अमोल गुलाबराव पवार,विजयसिंह बाबासाहेब शिंदे,विनोद पोपट टोपे,भगवान नारायण पोखरकर,विश्वास आनंदराव बुटे,देवराम गोविंद वाडेकर,दिलीप दत्तात्रय मोहिते, हे उमेदवार निवडणुक रिगंणात उतरले आहे.महिला प्रतिनिधी मधुन भावना अभिनाथ शेंडे, विजया रामदास शिंदे, क्रांती संदिप सोमवंशी, कमल भरत कड, इतर मागास प्रवर्गातुन हनुमंत अनंत कड, योगेश नारायण पठारे,तर अनुसूचित जमाती गटातुन विठ्ठल ढवळा वनघरे,डॉ.संतोष सिताराम सुपे अशी रंगत होणार आहे.

ग्रामपंचायतीच्या मतदार संघातील ४ जागांसाठी १० उमेदवार रिगंणात तर २१ जणांनी नामनिर्देशन पत्र माघार घेतले. या सर्वसाधारण गटातुन मनोहर सयाजी खांडेभराड,रणजित विठठल गाडे,सागर उत्तम मु-हे,शेखर अनिल तुपे, अनुसूचित जाती जमाती गटात कल्याणशिल राजाराम देखणे,मुदिता संजय देखणे,सुधीर मधुकर भोमाळे, अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातुन अशोक बबन राक्षे, अजय जयराम चव्हाण, वैभव दगडु गाडे हे उमेदवार आहेत. आडते व्यापारी मतदार संघात ८ उमेदवारांनी माघार घेतली तर ४ जण निवडणुक रिगंणात उतरले. यामध्ये महेंद्र हरिभाऊ गोरे, राम महादु गोरे, माणिक महादेव गोरे,विक्रमसिंह हिरामण शिंदे हे निवडणुक रिगंणात उतरले आहे. 

    हमाल मापाडी मतदार संघात ३ जणांची माघार होऊन सयाजी माणिक मोहिते, गणपत गेणु केळकर हे दोन जण रिगंणात उतरले आहेत. तर ग्रामपंचायतीच्या अर्थिक दर्बल घटकामधुन अजय चव्हाण तर ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती जमाती गटातुन कल्याणशिल देखणे हे अपक्ष उमेदवार निवडणुक रिगंणात उतरले. राष्ट्रवादी पुररस्कूत पॅनलने कपबशीचे चिन्ह मागितले तर भाजप शिवसेना पुरस्कुत पॅनलने नारळ चिन्हाची मागणी केली.