सतिश कडार्ला
प्रतिनिधी
गडचिरोली, दि.20 : सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात गेलेल्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी काळजी घेण्यांबाबत जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन केलेले आहे. याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करण्याचेही आवाहन प्रशासनाकडून जनतेस करण्यात येत आहे.
यामधे जर उष्माघाताची परिस्थिती उद्भवल्यास सर्वप्रथम व्यक्तिला सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे. शरीर ओले करुन, पंखा सुरु ठेवावा. शॉवर दिल्यास जास्त चांगले. पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा कापड अथवा टोपीचा वापर करा. दुपारी १२ ते ४ या वेळात उन्हात काम करणारे मजुर, शेतमजुर, विटाभट्टी कामगार व बांधकाम करणारे मजुर यांनी उन्हात काम करणे टाळावे. सुर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झुडपांचा वापर करा करण्यांत यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र, पांढरी सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपडयाने डोके, मान, चेहरा झाकण्यांत यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यांत आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियीमत करावा. लघवीचा रंग जास्त पिवळसर झाला किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास पाणी व वर नमूद केलेल्या पेय पदार्थाचे प्रमाण वाढवावे. अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यांत यावा. गुरांना छावणीत ठेवण्यांत यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यांस देण्यांत यावे. या प्रमाणे काळजी घेतल्यास बऱ्याच प्रमाणात उन्हामुळे होणारे आजार टाळता येतील.