संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थानचे तर्फे देहू संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे यांचा सत्कार… 

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनीधी 

आळंदी : वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू अध्यक्षपदी ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज मोरे यांची निवड झाल्या बदल शाल, श्रीफळ,उपरणे देऊन त्यांचा सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका संस्थानचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते करण्यात आला. 

    यावेळी देहू संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, माजी विश्वस्त ह.भ.प. विलास नाना मोरे यावेळी यांचा सत्कार ट्रस्ट तर्फे खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, साहेबराव वाळके यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. रमेश महाराज घोंगडे, किसन अप्पा लोखंडे, रमेश चौधरी, बाळासाहेब ठाकूर, माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील, उद्योजक तानाजी चौधरी, शिवाजी तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

  श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे यांनी थोरल्यापादुका मंदिर निर्माण कामाची पाहणी करून भव्य दिव्य मंदिर झाल्याचे सांगत मंदिर निर्माण कार्याचा गौरव करीत समाधान व्यक्त केले. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका संस्थानचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी संवाद साधत येथील कार्याची माहिती दिली.