चिमूर-पिंपळनेरी हायवे रोडवर बसचा भीषण अपघात.. — बस शेतात झाली पलटी..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी…

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर एस.टी.महामंडळ आगाराची नागपूरकडे धावणारी बस काही कळण्याच्या आतच पिंपळनेरी जवळ बॅरेक तोडून शेतात गेली व पलटी झाली.

     हि घटना आज सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे.सदर बस चालकाला महामंडळाची एसटी बस चालवत असताना फिट आल्याने अपघात झालाय.

          अपघातग्रस्त बसचा क्रमांक एम.एच.४०,सि.एम.४४१८ आहे.बस पलटी झाल्याची बातमी नागरिकांना आणि चिमूर पोलिसांना होताच नागरिक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

        जखमी नागरिकांना (प्रवाशांना) उपचारार्थ चिमूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.