
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक (महाराष्ट्र)…
भारत देशांतर्गत बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मण पुजाऱ्यांच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी आज चिमूर येथे महामोर्चा काढण्यात आला होता.
चंद्रपूर जिल्हातंर्गत येत असलेल्या ताडोबा व्याघ्र अभयारण्यातील जगप्रसिद्ध संघारामगिरीचे भदंत डॉ.धम्मचेती यांनी आजच्या मोर्चाचे नेतृत्व केले.
तद्वतच महाबोधी महाविहार मुक्त आंदोलन समितीचे चिमूर तालुका पदाधिकाऱ्यांनी आणि विविध स्तरांवरील मान्यवरांनी या महामोर्चाचे सह नेतृत्व केले.
पोलीस स्टेशन चिमूर जवळील संविधान चौकातून महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चाला प्रारंभ झाला.महत्वपुर्ण मार्गांनी महामोर्चा क्रम करीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिमूर-वरोरा मार्गावरील स्मारकाकडे आला.
तिथे सर्व मान्यवरांनी व सर्व मोर्चेकरी बांधवांनी महामानवास विनम्रपणे अभिवादन केले.यानंतर मोर्चा तहसील कार्यालया जवळ आला आणि मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
महाबोधी महाविहाराला ब्राह्मण पुजाऱ्यांच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी संविधान चौकातून निघालेला मोर्चा शांततेत क्रम करीत होता.
मात्र,या मोर्चाचे नेतृत्व भदंत डॉ.धम्मचेती करीत असताना त्यांनी अनेक स्लोगन भारदस्त आवाजात म्हटले.
यात १) ब्राह्मणवाद से आजादी,२) मनुवाद से आजादी,३) महाबोधी महाविहार ब्राह्मण के कब्जा से करो मुक्त,४) मोदी सरकार मुर्दाबाद,या गगनभेदी स्लोगनांनी मोर्चातील हजारो बांधवांत व भगिनीत तेजोमय उर्जा निर्माण केली आणि महाबोधी महाविहार मुक्ती संबंधाने त्यांच्यातील प्रचंड उत्साह मोर्चाच्या सांगता पर्यंत टिकवून ठेवला.
चिमूर तहसील कार्यालयापुढे मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यावर भदंत डॉ.धम्मचेती,महाबोधी महाविहार मुक्ती चिमूर तालुका समितीचे अध्यक्ष विलास राऊत, मुंबई उच्च न्यायालयातंर्गत नागपूर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अँड.भुपेस पाटील,वंचितचे जिल्हा युवा अध्यक्ष तथा महाबोधी महाविहार मुक्ती चिमूर तालुका समितीचे सचिव सुभंम मंडपे, सेवानिवृत्त शिक्षक नारायण कांबळे,अँड.नितीन रामटेके,अँड.जयदेव मुन,आणि इतर मान्यवरांनी उपस्थित मोर्चेकरांना संबोधित करताना,”महाबोधी महाविहार मुक्ती संबंधाने आणि महाबोधी महाविहार बांधकाम संबंधाने,तसेच ब्राह्मण पुजाऱ्यांच्या कब्जातून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंबंधाने इतर इतिहासीक संदर्भातंर्गत उचित व आवश्यक मार्गदर्शन केले.
महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चाला अनेक भिख्खू उपस्थित होते.याचबरोबर चिमूर तालुक्यातील हजारो बांधव तथा महिला भगिनींची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
चिमूर तहसीलच तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,बिहार राज्याचे महामहीम राज्यपाल नजीब जंग,आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांना निवेदन देण्यात आले.
तथागत भगवान गौतम बुद्धांनी महाबोधी प्राप्त केलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथे महाबोधी महाविहार राजा सम्राट अशोक यांनी इ.स.२६० मध्ये बांधकाम केले आहे.
यामुळे ब्राह्मण पुजाऱ्यांचा कुठलाही अधिकार महाबोधी महाविहारावर नसायला पाहिजे,हाच खरा निसर्ग व कृत्रिम नियम आहे.
तसेही ब्राह्मण हे विदेशी असल्याने त्यांना भारतात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव डॉ.प्रा.विलास खरात नेहमी सांगतात…