प्रतीकांचा संभ्रम आणि धर्माची दृष्टी…

प्रतीकांचा संभ्रम आणि धर्माची दृष्टी

         भारतीय संविधानाने आस्था आणि श्रद्धा याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकास दिले आहे.त्याच बरोबर कर्तव्य पण सांगितले आहे.ते असे की,प्रत्येकास आपापल्या रूढी परंपरा आस्था श्रद्धा जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे,पण इतरांच्या भावना दुखावणारे नाहीत याची काळजी घेतच हे स्वातंत्र्य उपभोग ता येईल.कारण सर्वानाच आस्था श्रद्धा चे स्वातंत्र्य आहे.त्यास बाधा आणता येणार नाही.कुणाच्या श्रद्धेला कुणी बाधा आणण्याचा प्रयत्न केला,अपमान केला तर त्यास कठोर दंडात्मक शिक्षा केली जाईल,अशी तरतूद संविधानात आहे.कायदा आहे.तरी काहिजन धर्माचा पांढरा चस्मा बदलून काळा वापरतात आणि काळे कृत्य करतात.

    या देशात श्रध्दा स्वातंत्र्य म्हणून सर्व धर्मांना त्यांच्या परंपरा जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे,तरी पण या देशातील विविध धर्माचे लोक ” माझाच धर्म श्रेष्ठ आणि इतरांचा धर्म कनिष्ठ ” असे समजून धरमधर्मात भेदभाव करतात. एव्हढ्या वरच थांबत नाहीत तर माझ्या धर्माचेच राज्य या देशावर असले पाहिजे,असे चुकीचे ,विदारक स्वप्न पाहतात.खरेतर प्रत्येक माणूस हा मानव आहे.तो पशू पक्षाच्या जातीचा नाही तर माणूस हा मानव वंशाचा आहे.सर्व माणसांची अवयव वेगवेगळे नसून सारखीच आहेत,म्हणजे प्रत्येकास दोनच हात पाय डोळे कान आणि एकच डोके आहे,म्हणून मानव जात ही ” माणूस ” या वंशाचा आहे.याचा अर्थ सर्व माणसे सारखीच आहेत, हे नैसर्गिक सत्य आहे.मग असे असताना ज्याने माणसाच्या जाती करून त्यांचेत श्रेष्ठ कनिष्ठ,उच्चनीच ,गरीब श्रीमंत असा भेदभाव येथील काही स्वार्थी.माणसांनी शोषकानी केला.याच प्रमाणे धर्म ही आस्था आणि श्रध्देचा विषय असूनही त्यात ही दूजाभाव निर्माण केला.संविधानाने सर्वधर्म समभाव,धर्मनिरपेक्षता हे तत्त्व मूल्य अधोरेखित केले,तरी पण काही शोषक शासक स्वार्थी बदमाश जनद्रोही देशद्रोही ,राष्ट्रद्रोही,विषमतावादी बुध्दीचे लोक हे सर्वधर्म समाभवाचे उद्दात आणि सर्वांचे भले करणारे ,अहिंसा आणि शांतता प्रस्थापित करणारे हे धर्मनिरपेक्ष तत्वाची पायमल्ली करताहेत.मग ते हिंदू मुस्लिम शीख इसई,कोणत्याही धर्माचे असोत,जे धर्मानुसार स्वतंत्र देशाची मागणी करताहेत,आणि देशाची अखंडता भंग करू पाहताहेत ते सर्व राष्ट्रद्रोही च समजावेत.

      खरे तर हा देश हुकुमशाही,साम्राज्य याच्या अधिपत्याखाली होता,सारी जनता एका व्यक्तीची गुलाम होती.एकच व्यक्तीचे राज्य होते.या देशातील सर्वच जाती धर्माचे लोक संघटित होऊन स्वातंत्र्याचा लढा 1957 ते 1947 पर्यंत म्हणजे 90 वर्ष निरंतर स्वातंत्र्या साठी लढाई केली.लाखो लोकांचे बलिदान झाले.ते साऱ्याच धर्माचे होते.त्यांनी ही लढाई जिंकली,आणि लोकशाही स्थापन केली.ही लोकशाही कुण्या एकाच्या बापाची मालमत्ता नव्हे,की कुण्या एका धर्माची हुकुमशाही नव्हे,या इतिहासाचे भान सर्व भारतीयांना असले पाहिजे.ते नाही.म्हणूनच संत महात्मे महामानव यांच्या प्रतिमांची अवहेलना अपमान करण्याचे हल्ली तर जोरात प्रयत्न चालले आहेत,आणि त्याकडे आजचे सरकार कानाडोळा करते.त्यांना शिक्षा होत नाही.याचा अर्थ देशद्रोही,राष्ट्रद्रोही,लोकशाही विरोधक,यांना सरकार पाठीशी घालत आहे.त्याचे कारण हे सरकार धर्मांध आहे.धर्मवादी आहे.उद्या हे जाऊन दुसऱ्या धर्माचे सरकार आले तरी हेच चालणार आहे.यावर उपाय म्हणजे जनतेनी वेळीच सावध होऊन धर्मांध आणि लोकशाही विरोधी प्रतिनिधींना पक्षांना,सरकारला निवडून आणता कामा नये.जनतेची अशी इच्छा असूनही जर सरकार अनेक युक्त्या करून परत परत निवडून येत असेल,जनतेची दिशाभूल करत असेल तर जनतेनी लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरले पाहिजे,आणि यांचे षडयंत्र, काळेकारस्थान बंद पाडले पाहिजे.तरच आस्था श्रध्दा स्वातंत्र्य टिकेल,सर्व धर्म टिकतील,लोकशाही टिकेल.अन्यथा धर्मच सत्तेत बसेल.सर्व बुवा बापू महाराज मठाधिपती पुजारी मंत्री संत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती राज्यपाल होऊन बसतील,गरीब असो की श्रीमंत,कुण्याही नागरिकास सरकारमध्ये सत्तेत जाता येणार नाही.कारण स्वतंत्र भारताचे लोकशाही संविधान बदलून,त्याजागी धर्माचे अधिष्ठान असलेले संविधान म्हणजे पेशवाईतील मनुस्मृती हे संविधान देशाला लागू होईल.तसेच पाऊले पडत आहेत.म्हणून या धर्मांध शक्तीचे कटकारस्थान समजून घेऊन जनतेने वेळीच सावध झाले पाहिजे.

  महागाई ,भ्रष्टाचार,परकीय कर्ज,बेकारी,शेतकरी आत्महत्या हे ज्वलंत प्रस्नाना बगल देऊन , औरंगजेबाची समाधी,राष्ट्रमाता जिजाऊ सावित्री यांचा अपमान,आंबेडकर ,शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुतळे ची विटंबना,असे काही संवेदनशील मुद्दे काढून लोकांचे लक्ष मूळ प्रस्नाकडे जाऊ नये.अन्यथा लोक विद्रोह करतील,हा एक उद्देश आणि धर्माचे राज्य असावे ,हा एक उद्देश घेऊन ही प्रतिगामी ,विषमतावादी,शक्ती प्रबळ होत आहे.हे मतदारांनी समजून घेणे,ही काळाची गरज आहे.

      लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

             दिनांक : 20 मार्च 2025

                   फोन : 9420912209.