
ऋषी सहारे
संपादक
आरमोरी : वैरागड हा गाव प्रचंड लोकसंख्येचा असून परिसरात मोठ्या प्रमाणात मोठी मोठी गावे आहेत आणि वैरागड हा मध्य ठिकाण आहे. परिसरात एखादा अपघात झाला असता किंवा कोणताही इमर्जन्सी पेशंट ला उपचारासाठी हलवायचे असल्यास रुग्णावाहीका उपलब्ध नसल्याने रुग्णाला वेळेत उपचार मिळत नाही आणि अनेकदा रुग्ण दगावल्याच्या घटना घडत आहेत. गरोदर मातासाठी रुग्णावाहीका आहे परंतु इतर पेशंट साठी ती उपलब्ध करता येत नाही. परंतु जिव प्रत्येकाचा महत्वाचा आहे आणि गोर गरिबांना सोयी, सुविधे अभावी जिव गमावणे म्हणजे रुग्णांच्या अधिकाराचे हनन आहे.
परिसरातील गोर, गरीब, कामगार, शेतकरी जनता इमर्जन्सी मध्ये घरातील रुग्णाला किंवा अपघात झालेल्या व्यक्तीला शहराकडे उपचाराकरिता नेतो म्हणल्यास खाजगी गाडीला किमान 3 ते 4 हजार रुपये मोजावे लागतात. अशावेळी अनेक जणांना पैशा अभावी वेळेत उपचार न मिळाल्याने जिव गमवावा लागतो.
एकतर इमार्जन्सी रुग्णासाठी कुठलेही उपचार आपल्या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे तातडीने सदर बाबीची दखल घेऊन वैरागड आरोग्य केंद्र विशेष बाब म्हणून तातडीने रुग्णावाहीका उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी आजाद समाज पार्टीचे आरमोरी तालूका सचिव सुरेंद्र वासनिक व परिसरातील नागरिकांनी केली.