जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी…  – भारुड सम्राट संदीप मोहिते सह अण्णा चव्हाण यांच्या जुगलबंदी भारुडाने भाविक व प्रेक्षकांची मने जिंकली….

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

          टणु तालुका इंदापूर येथील माजी सरपंच व जाणता राजा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ मोहिते सह सर्व शिवप्रेमी शिवभक्तांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

          महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ह भ प भारुड सम्राट सांगोला संदीप मोहिते महाराज व अण्णा चव्हाण महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

          जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून पिढ्या ना पिढ्या चालत आलेली शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.सर्व तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या वतीने अकलूज शिवसृष्टी किल्ला येथून शिवप्रेमी शिवभक्तांनी शिवज्योत घेत शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा करीत टणु येथील शिवभक्तांनी पाय पाय चालत ज्योत सर्व कार्यकर्त्यांनी आणली. सर्वच शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व ज्योतीचे पूजन पुष्प अर्पण करण्यात आले.

           संध्याकाळी सहा वाजता सर्व ग्रामस्थांना व भाविकांना महाप्रसाद व भोजन देण्यात आले संध्याकाळी आठ ते नऊ या वेळेत भारुड सम्राट ह भ प संदीप मोहिते, ह भ प अण्णा चव्हाण यांच्या जुगलबंदी भारुडाने शिवजयंती उत्साहाची सांगता झाली.