
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
मधमाशाच्या हल्यात दोन वन कर्मचारी जख्मी झाल्याची घटना मंगळवार रोजी १२-३० वाजताच्या सुमारास घडली असून वनरक्षक आणि वनमजूर आशा दोन वनकर्मचारी यांचा समावेश आहे. दिवाकर लहानुजी गुरनुले ५२ वर्ष (वनरक्षक) मिथुन अंबादास पेंदम ३० वर्ष (वनमजूर ) रा.पेंढरी असे जख्मी झालेल्या वनकर्मचारी यांचे नाव असून त्यांचेवर सावली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सध्या ख़रीपासह रब्बी पिकांचाही हंगाम संपन्याच्या मार्गावर आहे. तालुक्यात काही प्रमानात धानाचे डब्बल फसल सुरु असल्याने उर्वरित सारे क्षेत्र पिकाविना निर्जन आणि ओस असल्याचे दिसुन येत आहे.
तालुक्यातील पाथरी,पेंढरी व्याहाड,राजोली हे उपक्षेत्र अति संवेदन शील असून जंगलव्यात असल्याने या उपक्षेत्रात वन्यजीवांचे दर्शन,हल्ले दिसुन येतात वृक्षाच्या पानाची गळती सुरु असलेली पानझळी जनु वसंत ऋतुचे संकेत देत आहे.
त्यामुळे वनाचे आणि संगोपन आदि कामासाठी वनकर्मचारी याना आपापल्या क्षेत्रात भटकावे लागते घटनेच्या दिवशी सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र पेंढरी येथील वनरक्षक दिवाकर गुरनुले आणि वनमजूर मिथुन पेंदाम वनाची गस्त करीत होते. दरम्यान चकमांनकापुर येथून पेंढरीकड़े येत असताना नजिकच्या वृक्षावर बसलेल्या मधमाशाच्या एका थव्याने दोन्ही वनकर्मचारी यांचेवर हल्ला चढ़विला जंगलात सर्वत्र निर्जन आणि खुले वातावरण असल्याने मधमाशांच्या हल्ल्यातुन सुटका करने कठिन होऊन बसले.परिनामी मोठ्या हिमतीने दोन्ही वनकर्मचारी पेंढरी मुख्यालयापर्यंत पोहचले.
लागलीच त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले. जंगलव्याप्त भागात अनेक ठिकानी मधमाशांचे वास्तव्य असल्याने जीव मुठित ठेऊन जंगलात गस्त करण्याची वेळ निर्माण झाली आहे.
एकीकडे वन हिंस्र पशुची दहशत तर दुसरीकडे मधमाशांचा हल्ला आदी कारणास्त्व वनाचे संरक्षण आणि संगोपन करताना वन कर्मचारी याना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मधमाशाच्या हल्ल्यात जख्मी दोन्ही वनकर्मचारी सुखरूप असल्याचे पेंढरी मक़्ता उपवनक्षेत्रा कडून सांगितले जात आहे.
बॉक्स
पेंढरी ते पांढरसराङ चकमांनकापु लगत गस्त करीत असताना मधमाशांनी हल्ला केल्याने दोन्ही वन कर्मचारी यांना जख्मी केल्याची माहिती मिळताच सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे,सावलीचे क्षेत्र सहायक आर जी कोडापे यांनी मोक्यावर जाऊन पेंढरीचे क्षेत्र सहाय्यक मेश्राम यांच्या उपस्थितीत सदर जख़्मीना शासकीय वाहनाने ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचारार्थ भर्ती केले पुढील उपचार सुरू आहे.