शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा… 

ऋषी सहारे

  संपादक

आरमोरी – शिवाजी महाराजांची जयंती मौजा पाथरगोटा येथे मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली.

          आज दि. १९ फेब्रुवारी रोज रविवारला सायं ६ वाजता शिवजमोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्या निमित्याने कार्यक्रमला प्राचार्य योगेश जी ढोरे ,विनोद कोहपरे तालुका व्यसन मुक्ती सचिव आरमोरी, एस. पी. मेश्राम माजी केंद्रप्रमुख, कृषि उद्योजक विठ्ठल दोनाडकर, डॉक्टर यादवजी राऊत, वैभव राऊत प्रॉपर्टी डीलर नागपुर, दौलत धोटे पत्रकार, निलेश बुरlडे, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम मैंद, सिध्दार्थ घुटके आदी मान्यवर उपस्थित होते.

          कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा आपल्या जीवनात उपयोग करून आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन कसे उंचवता येईल यावर प्रकाश टाकला.

          कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूत्रसंचालन प्रा.जी.एम. दोणाडकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रदिप दोनाडकर यांनी केलं.प्रदीप दोणाडकर,एकनाथ ठाकरे, तेजस ढोंगे, विशाल चोपकार,कनैया मेश्राम,वैभव दोनाडकर, मंगेश पिलारे, राजेश्वर कुथे, कुणाल ढोंगे, वैभव राऊत,सागर प्रधान, नानू मारबते,वैभव दहिकर,विशाल दहीकर,शेषराव बुल्ले, अनिल बगमारे , माणिक ठाकरे,कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व गावातील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.