महात्मा गांधी कला,विज्ञान व स्व.नं.पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी…

अनिलकुमार एन.ठवरे 

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

आरमोरी :- शिवजयंतीचे औचित्य साधून मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरी द्वारा संचालित महात्मा गांधी कला,विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरीच्या वतीने एका त्रिवेणी संगमिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी शिवजयंती साजरी करण्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर इतिहास प्रमुख प्रा.गिरडकर सर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.त्याच बरोबर पालक – शिक्षक – विद्यार्थी मेळावा घेण्यात आला.या प्रसंगी पालक – शिक्षक समिती प्रमुख प्रा.रामटेके सर यांनी शिक्षक व विद्यार्थी या मधील दुवा हा पालक वर्ग आहे असे प्रतिपादन केले.

             विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळावा व पालकांना सुध्दा आपल्या समोर आपल्या पाल्याना सन्मानित होताना बघून धन्यता वाटावी या दूरदृष्टीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

           या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. खालसा सर यांनी जो पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कृतपणा येत नाही तोपर्यंत विद्यार्थी हा पूर्णत्वास प्राप्त होत नाही असे प्रतिपादन केले.

              वरील कार्यक्रमास उप प्राचार्य डॉ. डोर्लीकर सर, पालक-शिक्षक समिती सदस्य श्री. निमजे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.शशिकांत गेडाम,प्रा.ठवरे सर व इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.संचालन व आभारप्रदर्शन प्रा.बोरकर सर यांनी केले.