कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधि पारशिवणी
पारशिवनी: -पारशिवनी तालुक्यातील गरंडा गावात शेतकरी, कष्टकरी महासंघाची जनजागृती संवाद बैठकीला गावातील शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हितार्थ लढयात सहकार्य व सहभागी होण्याची हमी व समर्थन केले.
आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करित असुन कृषी प्रदान देशात शेतकरी दैना अवस्थेत येऊन पोहचाला आहे. तरी कुणीही शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर बोलताना दिसत नसल्याने बळीराजाची दैना अवस्था निर्माण झाल्याने रामटेक लोकसभा माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयाच्या नेतुत्वात ” शेतकरी कष्टकरी महासंघाची स्थापना करून पहिल्यांदा नागपुर जिल्हा व रामटेक लोकसभा अंतर्गत ग्रामिण भागातील गावामध्ये शेतक-यांच्या भेटी, संवाद सभा व बैठकी घेऊन हितगुज करित जनजागृती कार्यक्रमांतर्गत पारशिवनी तालुक्यातील गरंडागावातील मंदीराच्या आवारात माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, डॉ.अरुण वराडे, पुरशोतम धोटे माजी सरपंच, सौ. सोनु प्रविण धोटे सरपंचा ग्राम पंचायत गरडा , राजेन्द महाजन , मनोज आपुरकर , दिलीप राईकवार , गिरधर धोटे, प्रशांत भोयर आदिच्या प्रमुख उपस्थित गावातील शेतक-याशी संवाद साधुन जनजागृती करण्यात आली.
आपल्या भारत देशात झालेली कृषी क्रांती प्रत्यक्ष अमलात आणण्या करिता आता फक्त लढाई फक्त पोशिंद्या साठीच करायची असुन जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतीला कृषी एक्सप्रेस फिडर ने नियमित विज पुरवठा करून विधृत मिटर लावुन विधृत बिल घेण्यात येत नाही. पेंच धरण शेतक-या करिता असुन सुध्दा जिल्हयातील शेतीला फक्त ५ ते १० टक्के पाणी मिळते, त्यामुळे मुबलक पाणी सिंचना करिता मिळावे. शेत विमा, शेतक-याना हक्काचे न्याय मिळण्यास विशेष शेतकरी न्यायालया ची स्थापना व्हावी. राज्य व केंद्रात शिक्षक, पदविधर, सांस्कृतिक जनप्रतिनिधीची जशी निवड होते, त्याच प्रमाणे शेतक-यांचे जनप्रतिनिधी ची सुध्दा निवड करण्यात यावी.
या सर्व शेतकरी, कष्टक-यांच्या न्याय हिताच्या बाबी पुर्ण करण्याकरिता शेतक-यांना एकत्र एकसंघ करून एक नवी चळवळ उभी करित शेतक ऱ्यांवरील समुळ अन्याय नष्ट करे पर्यंत आत्ता थांबणे नाही. असे प्रखर संबोधन मा. प्रकाशभाऊ जाधव हयानी केल्याने येथिल शेतक-यात नवचैत्यण निर्माण होत गावकरी शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद देत शेत क-यांच्या हितार्थ लढयात सहकार्य व सहभागी होण्याची हमी दिली. या संवाद बैठकीच्या यशस्वितेकरिता गरंडा गावातील नागरिक आदीसह शेतकरी गावक-यांनी मोठ्या संख्योत उपस्थित राहुन सहकार्य केले.