प्रितम जनबंधु
संपादक
गडचिरोली:- राज्यातील लढवय्ये, पुरोगामी, प्रसिद्ध विचारवंत काॅ. अॅड. गोंविद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ दि.१६फेब्रुवारी २०१५ रोजी भ्याड हल्ला करून बेछुट गोळीबार करण्यात आला. ह्या मध्ये काॅ. अॅड. गोंविद पानसरे व त्यांच्या पत्नी उमाताई गंभीर जखमी झाल्या. उमाताई ह्या थोडक्यात बचावल्या. काॅ.पानसरे यांचे उपचारादरम्यान दि.२० फेब्रुवारी २०१५ रोजी दु:खद दिधन झाले. या घटनेला आज आठ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु अद्याप ही त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. तसेच या हल्ल्यामागिल मुख्य सुञधारांना अटक करण्यात आलेली नाही.
या घटनेचा तपास आजपर्यंत विशेष तपास पथक एस.आय.टी.कडे होता.आणि आता तो दहशतवाद विरोधी पथकाकडे ए.टी.एस.कडे सोपविण्यात आला आहे. परंतु तपास हाती घेतल्याबरोबर लगेच ए. टी. एस. चे अधिकारी न्यायालयात फरार आरोपींना शोधने कठिण आहे, असे बयान देऊन आपली जबाबदारी झटकण्याचे काम करीत आहेत. परिणामता काॅ.पानसरे, डॉ. दाभोलकर, व इतरही विचारवंतांच्या मारेकऱ्यांना मोकाट फिरण्याची मुभा मिळत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य कष्टकऱ्यांची बाजू घेणाऱ्यां विचारवंत, लेखकांना, कार्यकर्त्यांना खोट्या केसेस मध्ये गुंतवून वर्षानुवर्षे तुरुंगात डांबून ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे.
काॅ.गोंविद पानसरे यांनी विविध पुस्तकांचे लिखाण केलेले असुन यात “राजेश्नी शाहू महाराज” ”वसा आणि वारसा” ”माॅर्क्सवादाची तोंड ओळख” व शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणारे, महाराष्ट्रात अंत्यंत गाजलेले ” शिवाजी कोण होता ?” इत्यादी पुस्तकांचे लेखन केले होते. तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनेक वर्ष राज्य सचिव, राष्ट्रीय परिषदेवर होते.त्यांनी फेरीवाले ( हाॅकर्स ) फुटपाथ दुकानदार, मोलकरीण संघटना इत्यादींची स्थापना केली आहे. हेमंत करकरे यांच्या मारेकऱ्यांच्या विषयी आय.पी.एस. अधिकारी मुसिफ यांनी लिहिलेल्या “द क्लीड” या पुस्तकावर शंभर व्याख्याने आयोजित करण्याचा संकल्प केला होता.यामुळे प्रतिगामी विचार सरणीची पाळेमुळे उगळ होणार होती. म्हणूनचं वयोवृद्ध नेत्यावर धर्मांध शक्तींने भ्याडपणे हल्ला करून ठार मारले. परंतु अजूनही त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून त्यांना राज्य सरकार शिक्षा देवू शकले नाहीत.या मारेकऱ्यांना पकडून कठोर शिक्षा करावी.या साठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. याचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.
काॅ.डाॅ.महेश कोपूलवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य,काॅ.देवराव चवळे, जिल्हा सचिव भाकप, रोहिदास राऊत, केंद्रीय उपाध्यक्ष अ.भा.रिप.पक्ष, मुनेश्वर बोरकर, जिल्हाध्यक्ष पीरिपा, प्रदिप भैसारे, हंसराज उंदिरवाडे,नीता सहारे, अशोक खोब्रागडे, केशवराव सामृतवार, नरेंद्र रायपूरे,वनमाला झाडे,पुनम भैसारे, गोविंदा ब्राह्मणवाडे, विलास निंबोळकर,सुरेश सोनटक्के, दादाजी धाकडे,डब्बाजी नरुले,काॅ.मिनाक्षी सेलोकर,काॅ.सिंधू कापकर,कुसूम टेकाम, मंगला बुधे,अमिता कोरवरकर,अमिला नैताम,दुर्गा कुर्वे, मिनाक्षी छापले,राधा ठाकरे,मिरा बांगरे, प्रकाश खोब्रागडे, प्रशांत खोब्रागडे, अमोल दामले, इत्यादी होते.