सावली – (सुधाकर दुधे)
रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आणि माउंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मान.के.एन.बोरकर साहेब, संस्थेच्या सचिव मान.व्हि.सी.गेडाम मॅडम त्याचबरोबर संस्थेचे संचालक मान.वसंत बोरकर,यु.एम.गेडाम,बि.के. गोवर्धन, सि.आर.गेडाम,तर विद्यालयाचे प्राचार्य मान.एन.एल.
शेंडे व माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मान.पी.जी.रामटेके आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.व्हि.के.गायकवाड सर उपस्थित होते.
सर्वप्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर महाराष्ट्र राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा…गायन करण्यात आले आणि नवसंचार विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला.प्रा.व्हि.के.गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना गनिमी कावा कसा करावा, त्याचबरोबर राजे छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माधिष्ठित नसून सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते होते,असे सखोल मार्गदर्शन केले, तर अध्यक्षीय भाषणातून मान.के.एन.बोरकर साहेब यांनी सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला,भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊनी तलवार शत्रुवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला.अशा शायराना अंदाजातून शिवरायांचे विचार पटवून दिले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एच.आर.कस्तुरे सर तर आभार प्रदर्शन एम.पी.निमसटकर मॅडम यांनी केले.