नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षा महाविद्यालय साकोली व राजीव गांधी महाविद्याल सडक अर्जुनी द्वारा आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन साकोली येथे करण्यात आले त्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ सुनील चतुर्वेदी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री जावेद अली जनरल सेक्रेटरी स्टॅन्डबॉल फेडरेशन ऑफ इंडिया , मुख्य अतिथी म्हणून डॉ साजिया अली खान कोषाध्यक्ष स्टँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व डॉ जितेंद्र कुमार ठाकूर प्राध्यापक राजीव गांधी महाविद्यालय सडक अर्जुनी व अतिथी म्हणून श्री घनश्याम निखाडे प्राचार्य ब्रह्मानंद करंजेकर पॉलिटेक्निक साकोली हे होते त्या प्रसंगी जावेद अली यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले की पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच नवीन खेळाचे आयोजन वैनगंगा शारीरिक शिक्षा महाविद्यालय साकोली येथे करण्यात आला आहे त्यामध्ये स्टॅन्डबॉल बद्दलची माहिती ,नियमावली आणि नेपाळ मध्ये नुकताच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्टँडबॉल स्पर्धेचे आयोजनाबद्दलची माहिती सांगितले त्यामागील पार्श्वभूमी आणि त्यापासून विद्यार्थ्यांना भेटणारे फायदे या सर्व गोष्टी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले त्याचबरोबर डॉ साजिया अली खान यांनी विद्यार्थ्यांना या खेळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल व या खेळाचा भरपूर फायदा घ्यावा असे सांगितले.
त्याचबरोबर परिसंवाद संपल्यानंतर सर्वांना मैदानी खेळ कसे खेळायचे याबद्दलची माहिती दिली आणि मैदानावर त्याबद्दलच्या प्रात्यक्षिक करण्यात आलं त्याप्रसंगी दोन संघांमध्ये तो सामना झाला आणि त्यामध्ये मॅच रेफरी म्हणून पार्वती मीना व भिमसिंग मीना म्हणून यांनी सहकार्य केले
ऑल इंडिया फेडरेशन कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
परिसंवाद मध्ये उपस्थित सर्व २०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवेंद्र इसापुरे यांनी केले प्रस्तावना डॉक्टर जितेंद्र कुमार ठाकूर यांनी केले तर आभार डॉक्टर राजश्री मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी पुकराज लांजेवार ,नीरज अतकरी ,साहिद सय्यद व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.