पिंपरी बुद्रुक येथे हरिनाम सप्ताह निमित्त श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रंथाचे पूजन करून सप्ताहाला प्रारंभ….

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे पिरसाहेब बाबांच्या पावन भूमीत सालाबाद प्रमाणे श्री गुरु दत्त जयंती निमित्त ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या सौजन्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

            जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान अकरावे वंशज श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर मळवली यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांच्या उपस्थिती मध्ये बुधवार दिनांक 20 /12 /2023 रोजी सकाळी 8 वाजता व्यासपीठ व विना पूजन होऊन अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला.

              दररोज नित्यनेमाने सकाळी काकडा आरती गाथा भजन हरिपाठ भोजन व संध्याकाळी 6 ते 8 भोजन, व भोजना नंतर रोज 8 ते 10 किर्तन नंतर हरिजागर व नामाचा जयघोष करून भरगच्च कार्यक्रमाने सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. सप्ताहासाठी, समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक आजी, माजी सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व वारकरी आणि भाविक भक्त यांच्या प्रयत्नातून सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला .

           सर्व भागातील भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने नामाचा रस घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे आसे पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या व भाविकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

चौकट

        प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे पिंपरी बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा करण्यात येत असते.