सालई शेतशिवारातील लघुदाब वाहीनीचे ६ सिमेंट पोलचे अज्ञात चोर व्यक्तींनी केले नुकसान.. — १९२० मिटर कंडक्टर तार चोरानी नेले चोरुन..

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

 

पारशिवनी:- पारशिवनी तालुका तील पो.स्टे. पारशिवनी अंतर्गत १७ किमी अंतरावर असलेले मौजा सालई मोकासा शेतशिवार येथे दिनांक १२ डिसेंबरचे रात्रो साडेआठ वाजता व १३ डिसेंबर चे सकाळी साडेनऊ वाजता पूर्वी घडलेल्या घटनेबद्दल फिर्यादी नामे महेंद्र काशीराम हेडाऊ,वय ४५ वर्ष,रा.कनिष्ठ अभियंता दहेगाव जोशी महावितरण पारशिवनी यांनी पो.स्टे.ला येवून पोल नुकसान व कंडक्टर तार चोरी बाबत तोंडी रिपोर्ट दिली.

         महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.उपविभाग पारशिवनी यांचे सालई शेत शिवारातील लघुदाब वाहीनीचे ६ सिमेंट पोल वरील लावलेले १) एएनटी कंडक्टर तार १४४० मी. कि.३४ हजार २१४/- रू 

२) जीएनएटी कंडक्टर न्यूटल तार ४८० मि. किंमत ५ हजार ८९४/- रू असा एकुण ४० हजार १०८/- रूपयाचा मुद्देमाल कापून अज्ञात चोराने चोरून नेले व ६ सिमेंट पोल तोडुन किंमती १४ हजार २५६/- रू.चे नुकसान केले असल्याचे तोंडी तक्रारी दाखल सांगण्यात आले.

       या प्रकरणी फिर्यादी महेंद्र काशीराम हेडाऊ, वय ४५ वर्ष, रा. कनिष्ठ अभियंता दहेगाव जोशी महावितरण पारशिवनी यांच्या रिपोर्ट वरून पो स्टे. पारशिवनी येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९, ४२७ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोद केला आहे. 

          अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राहुल सोनवने यांचे मार्गदशनात पोलिस हवालदार दिलीप टेकाम हे करीत आहेत.