दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्युज भारत
आरमोरी
तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशपुर येथे शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्याने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गणेशपुर च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच आदरणीय खुशालजी वलादे यांनी आपल्या भाषणातून शालेय विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज यांच्यासारखे धाडस दाखवून शालेय विद्यार्थ्यांनी आपले अमूल्य जीवन घडवावे आणि समाजातील आई बहिण यांच्यावर घडणाऱ्या अत्याचार.विरोधात समाजातील युवकांनी शिवाजी
महाराज यांचे कर्तुत्वाची प्रेरणा घेऊन समाज हिताचे कार्य करावे
असे प्रतिपादन सरपंच खुशाल वलादे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम उधघाटन प्रसंगी व्यासपिटा वरून केले .या उद्घाटन कार्यक्रमाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रामकृष्ण मडावी अध्यक्ष म्हणून माजी सरपंच विश्वेश्वर दरो दिनेश बनकर पत्रकार डी डी
उईके वणपाल सिर्सि मंगेश चापले गणेशपुर अशोक फुकटे बाळकृष्ण थोरात बाबू सिरोंचा प्रश्यांत कोटगले पोलीस पाटील कलपणा तिजारे ,विद्या मेश्राम ,मुनेश्र्वर भैसारे सदश सुरेश फुकटे सदश बोबाटे उपसरपंच
प्रा.फाल्गुन नरुले रवी ठलाल मुख्याध्यापक प्रवीण सहारे शिक्षक
कुळमेथे सदश आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.फाल्गुन नरुले यांनी केले संचालन
रवी ठलाल सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण साहारे यांनी मानले .