
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
भारतीय बौध्द महासभेचे कार्य व संघटना पदाधिकारी यांची जबाबदारी समजुन घेणे आवश्यक आहे. संस्थेचे दहा उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी संस्था काम करीत असते. हि बौध्दांची मातृ संस्था असून चारित्र्यवान व शिलवान माणुस निर्मिती करणे हे उद्दिष्ट आहे.
संस्थेच्या प्रत्येक पदाधिका-याला संस्थेची आचारसंहिता बंधनकारक असते. आपण किती शिकलो, त्यापेक्षा आपण किती शिलवान आहोत याला जास्त महत्व असते. शिलवान पदाधिका-यामुळे संस्थेचे कार्य टिकुन आहे. बौध्द धम्म हा आचरण करण्याचा धम्म आहे. ज्याचे आचरण पंचशिलावर अवलंबून आहे. तोच बौध्द धम्माला पुढे नेवु शकतो असे प्रतिपादन भारतीय बौध्द महासभा गडचिरोलीचे अध्यक्ष तुलाराम राऊत यांनी व्यक्त केले. ते चिमुर येथील कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लहुजी पाटील, उद्घाटक डॉ. राजपाल खोब्रागडे, मुख्य मार्गदर्शक शिशिर घोनमोडे, लोमेश खोब्रागडे, रमेश मानकर, जनार्धन खोब्रागडे, अॅड. संजीवनी सातारडे, सोनाली गजभीये, मंसाराम सहारे, पदमाकर नारनवरे, जि. एम. बांबोडे, अविनाश वाकडे, अंबादास कोसे, प्रा. गौतम डांगे, नारायण कांबळे गुरुजी, घनश्याम भडके, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र सहारे, उध्दव मोहोड, उध्दव खाडे, रामदास कामडी, भद्रीनाथ देसाई, आनंदराव शंभरकर, डॉ. बाळासाहेब बन्सोड, शिवराम मेश्राम आदीसह ३५ समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय बौध्द महासभा तालुका चिमुर करीता अध्यक्ष म्हणुन शिवराम मेश्राम व अॅड. संजीवनी सातारडे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन नथ्थुजी रामटेके, प्रास्ताविक शिवराम मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार पितांबर खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी व ग्रामशाखेचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.