
राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
कुरखेडा (गडचिरोली)
तालुका अर्जुनी मोरगाव अंतर्गत असलेल्या मौजा मांडोखाल येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या विशेष कार्यक्रमा प्रसंगी आमदार रामदास मसराम यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षन वाढवून गेली.या स्मारकाचे केंद्रबिंदू असलेला भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या आदिवासी हक्क,शौर्य,आणि स्वातंत्र्यलढ्याच्या योगदानाचे स्मरण केले.त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत,आदिवासी समाजाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्यात आले.
आमदार रामदास मसराम यांनी आपल्या भाषणात भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य हे आजच्या पिढीसाठी आदर्श असल्याचे सांगितले.त्यांच्या संघर्षाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला असल्याचेही त्यांनी नमूद केले.त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली व समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
उद्घाटन सोहळ्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.आदिवासी पारंपरिक नृत्य, गीते,आणि कलेच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेतला गेला.
कार्यक्रमास स्थानिक नेते,सामाजिक कार्यकर्ते,आणि आदिवासी समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती….