
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
जनविकास शिक्षण संस्था येवदाद्वारा संचालित कला वाणिज्य महाविद्यालय येवदा येथील सभागृहात कै. वासुदेवराव कोकाटे व्याख्यानमाला संपन्न झाली.
या व्याख्यानमालेचे अध्यक्ष अलकाताई कोकाटे संचालिका जनविकास शिक्षण संस्था येवदा हे होते तर प्रमुख उपस्थिती गजानन कोकाटे सचिव,किरणताई कोकाटे सहसचिव देविदास कोकाटे तसेच नीलकंठ गणवीर दिलीप डवरे व संजय पखान उपस्थित होते.
या व्याख्यानमालेत प्रथम पुष्प अविनाशजी दुधे यांनी “सोशल मीडियाचा मानवी मेंदूवर सर्जिकल स्ट्राइक” या विषयावर आपले व्याख्यान सादर केले. तर अर्चनाताई पखान यांनी “नसत्या जिजाऊ तर नसते घडले शिवराय” या विषयावर व्याख्यान आयोजित केले.
याप्रसंगी अलकाताई कोकाटे जनविकास शिक्षण संस्था द्वारा संचालित संत नारायण गुरु विद्यालय गायवाडी येथून मुख्याध्यापक या पदावर सेवानिवृत्त झाल्याबद्दल कला वाणिज्य महाविद्यालय तर्फे त्यांचा सत्कार घेण्यात आला.
तसेच कै. वासुदेवराव कोकाटे यांच्या पत्नी किरण ताई कोकाटे अविनाशजी दुधे सुप्रसिद्ध पत्रकार व अर्चनाताई पठाण यांचा शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार घेण्यात आला.
मानवी मेंदूवर सोशल मीडियाचा जो सर्जिकल स्ट्राइक झालेला आहे, त्याचा आपल्या जीवनात प्रभाव पडू नये आणि सोशल मीडियाचा उपयोग मानवाने आपल्या विकासासाठी करावा असे प्रतिपादन केले. तसेच अर्चनाताई पखान यांनी मासाहेब जिजाऊ यांच्या चरित्राचा, कर्तृत्वाचा अत्यंत ज्वलंत आढावा घेत सविस्तर विवेचन सादर केले आणि स्त्रियांमध्ये हे गुण विकसित करण्यासाठी जिजाऊ साहेबांचे चरित्र वाचन करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी गजाननराव कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाचन संस्कृती ही जीवन संस्कृती असे विचार मांडले. तसेच प्राध्यापक वाय, जे, सिंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले, महाविद्यालयातून “संविधान, संविधानवाद आणि संवैधानिक नैतिकता” या विषयावर प्रा. डॉ. संदीप डोंगरे आणि सुनील थोरात द्वारा संपादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.अतुल टेवरे व प्रास्ताविक डॉ.अनिल कत्रोजवार आणि, आभारप्रदर्शन डॉ.सुनिता सावरकर यांनी केले.याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्रा. वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.