
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकीची व सांस्कृतिक सुसंस्कारांची जाणिव ठेवून दरवर्षीप्रमाणे यंदाही चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव येथे नागदिवाळी महोत्सव थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्या तथा भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा मायाताई नन्नावरे होत्या तर मुख्य मार्गदर्शक म्हणून काँग्रेस पक्षाच्या तालुका पदाधिकारी तथा माजी प.स.सदस्या भावनाताई बावनकर,समाजसेविका गिता रानडे होत्या..
विशेष अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंच्या सौ.मुक्ताताई कापसे,उपसरपंच धारणे,काँग्रेस पदाधिकारी-पत्रकार तथा कोटगाव ग्रामपंचायतचे सदस्य उपक्षम रामटेके,ग्रामपंचायत सदस्या वनिता घोडमारे आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मायाताई नन्नावरे,मुख्य मार्गदर्शक भावनाताई बावनकर,गिता रानडे,उपक्षम रामटेके यांनी भगवान बिरसा मुंडा,स्त्रि शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,युगप्रवर्तक-जगविख्यात थोर समाजसुधारक-जगमान्य प्रकांड पंडित-भारतीय संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि नाग दिवाळी संबंधाने महत्त्वपूर्ण असे आवश्यक मार्गदर्शन केले.
याचबरोबर सामाजिक बांधिलकी तथा सांस्कृतिक वारसा यावर आपल्या मार्गदर्शनातून सविस्तर प्रकाश टाकलाय.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माना समाज भगिनींनी केले होते.नाग दिवाळी कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.