
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
वंचित बहुजन आघाडी अमरावती पश्चिम विभाग जिल्हा कार्यकारिणी व तालुकाप्रमुख युवक तालुकाप्रमुख महिला कार्यकारिणी यांची महत्वपूर्ण बैठक 19 जानेवारीला विश्राम गृह दर्यापूर येथे संपन्न झाली.
महानगरपालिका, नगरपालिका निवडणूक संदर्भात पक्ष बांधणी, पक्षांमध्ये नवीन कार्यकारिणी गठीत करणे, बूथ प्रमुखांची नेमणूक करणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी केले.
सर्व पदाधिकारी यांना जि. प., पं.स चा कार्यकाळ 16 जानेवारी 25, 17 जानेवारी 25 रोजी संपुष्टात येत आहे असा आदेश ग्रामिण विकास विभाग 15 जानेवारी 25 च्या पत्राचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये दिनांक 14 फेब्रुवारी 25 रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यकाल हा संपुष्टात येत आहे.
14 फेब्रुवारी नंतर कधीही निवडणुक आचारसंहिता लागू शकते याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागले पाहिजे असे आदेश या बैठकीत देण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा महासचिव साहेबराव वाकपांजर, जिल्हा उपाध्यक्ष बाबुलाल धाकडे, जिल्हा महासचिव अशोक नवलकर, जिल्हा सचिव अशोक दूधंडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राजूरकर, जिल्हा सचिव संतोष बगाडे, दर्यापूर तालुका अध्यक्ष सुरेंद्र तायडे, भातकुली तालुका अध्यक्ष देवानंद इंगळे, रामभाऊ वानखडे, गोवर्धन वाघमारे, आनंद वर्धन अडीकणे, बबनराव जवंजाळ, महिला तालुकाध्यक्ष आम्रपाली आठवले. शहराध्यक्ष रीनाताई तायडे. प्रतिभा मोहोड उमा हंबर्डे. नंदाताई हंबर्डे, सुनील वाकपांजर, सुरेश वाकपांजर, देवानंद धांदे, भीमराव कुऱ्हाडे, विजू चौरपगार, सत्तार भाई, प्रा.डोंगरे सर, शहराध्यक्ष ऍड संजय आठवले, लक्ष्मण उमा ळे, नागोराव वानखडे, देवराव वाकपांजर, सम्यक मोहोड , मयूर गवई, युवा तालुकाध्यक्ष उत्कर्ष चौरपगार, मनोज जामनिक, आशिष गावंडे, प्रफुल चौरपगार, चंदू भाऊ रायबोले, ऋषी कोकाटे, मंगेश भदे, अनिल खोब्रागडे, दिनेश भटकर,मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.