NEP-२०२० उद्दिष्टे योग्य अंमलबजावणीतून साध्य करावे :- डॉ. श्रीनिवास खांदेवाले…

       रामदास ठूसे

नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी 

         गांधी सेवा शिक्षण समिती, चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर वाणिज्य व अर्थशास्त्र विभागामार्फत 18 जानेवारी 2025 ला “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020: वाणिज्य आणि अर्थशास्त्र शिक्षण आणि संशोधनातील संभावना आणि आव्हाने” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.

           परिषदेचे उद्घाटक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अर्थतज्ञ यांनी मनोगतातून NEP 2020 ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तिच्या योग्य अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचे सांगितले. चिमूरच्या क्रांतीतील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भाषणाचे महत्त्व व्यक्त केले.

           परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्रा. एम. जी भोयर, कोषाध्यक्ष, गांधी सेवा शिक्षण समिती, चिमूर यांनी NEP-2020 चे रोजगार निर्मितीतील स्थान स्पष्ट केले. प्रमुख वक्ता म्हणून डॉ. एच. ए. हुद्दा, कार्याध्यक्ष, विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण व साक्षरता यातील फरक स्पष्ट केला. उदय, इतिहास, परंपरा आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलाच्या संदर्भात मत व्यक्त केले.

          याप्रसंगी प्रा. विनायकरावजी कापसे, सचिव, गांधी सेवा शिक्षण समिती, चिमूर प्रमूख उपस्थिती होती. चर्चासत्राच्या उद्घघाटनात प्राचार्य, डॉ.अश्विन एम. चंदेल यांनी आपल्या मनोगतातून परिषदेचे महत्त्व स्पष्ट केले. उद्घाटन प्रसंगी डॉ. जे. एम. काकडे,डॉ. अनंता देशमुख, डॉ. मधुकर नक्षीने, डॉ उत्तमचंद कांबळे उपप्राचार्य,डॉ.प्रफुल्ल बन्सोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

       सदर परिषदेत विविध महाविद्यालयातील वाणिज्य व अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक संशोधक व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. परिषद यशस्वी होण्याकरिता गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले यांनी शुभेच्छा दिल्या.

          प्रास्ताविक परिषदेचे आयोजक डॉ. हरेश टी. गजभिये वाणिज्य विभाग प्रमुख यांनी केले. संचालन अंतर्गत गुणवत्ता सेल चे प्रा. ए. एम. पोपटे यांनी केले परिषदेचे आयोजक डॉ.राजेश्वर रहांगडाले, यांनी आभार मानले. प्रा.डॉ.लक्ष्मण कांमडी यानी परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.        

           परिषद यशस्वीरीत्या संपन्न होण्याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.