
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर :- तालुक्यात अवैध दारुविक्री,सट्टापट्टी,जुगार सुरू असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.चिमूर,खडसंगी,नेरी,जांभूळघाट,भिसी,मासळ, आंबोली,शंकरपूर परिसरात अवैध दारुविक्री, जुगार,सट्टापट्टी सूरु असल्यामुळे युवक,विद्यार्थी त्याच्या आहारी जात आहे.
त्यामुळे अवैध धंदे तत्काळ बंद करावे,अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्य चिमूर तालुकाध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी केली आहे.
चिमूर तालुक्यात युवक व विद्यार्थी हा व्यसनाधीन होत आहे.त्यामुळे तत्काळ अवैध धंदे बंद करा,अन्यथा चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयापुढे युवकांच्या वतीने आंदोलन करू,असा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र चिमूर तालुकाध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी दिला आहे.