स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट तथा श्री जे के पाल ज्युनियर सायन्स कॉलेज व्याहाड खुर्द येथे स्नेह संमेलन संपन्न…

    सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

 सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट स्कुल व श्री जे के पाल ज्युनियर सायन्स कॉलेज च्या भव्य पटांगणात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वामी विवेकानंद तथा राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्य वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला.

           या कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मश्री पुरस्कृत डॉ. परशुरामजी खुणे सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री जोगेश्वरजी पाल, संस्थेचे अध्यक्ष अविनाशजी पाल यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.

            या कार्यक्रमामध्ये शाळेच्या नर्सरी पासून ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत तसेच नृत्य, गायन व एकांकिकात भाग घेऊन प्रेषकांचे मन जिंकली.

          विशेष करून नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन पालक वर्गानी नृत्य व गायन सादर केला.

        कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ व अन्य शूरवीरांच्या फोटोला माला अर्पण करून करण्यात आले.

          या प्रसंगी अशोका बहुउद्देशीय शिक्षण संस्था व एपेजी सेवा केंद्र व्याहाड खुर्द यांच्या वतीने समाजातील उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा शाल श्रीफळ व सम्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

          सत्कारमूर्ती झाडीपट्टीतील उत्कृष्ट नाट्य कलाकार पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे, MPSC परीक्षेत प्राविण्य मिळविलेली सविता भोयर (सूरकर), नवोदय परीक्षेसाठी उत्कृष्ट शिक्षक म्हणून रेवण मोहुर्ले सर, सावली तालुक्यातून महाराष्ट्र शासनाने आदिवासी विभागातून विदेश शिक्षणासाठी निवड झालेली प्रिया यशवंत ताडाम तसेच विदर्भातील पहिल्या हिंदी बेबस चित्रपटात काम करणारा शाळेचा माजी विद्यार्थी हर्ष बोदलकर यांचे सत्कार करण्यात आले.

             या कार्यक्रमाला उद्घाटक डॉ. परशुराम खुणे , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जोगेश्वर पाल, वासनिक सर गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली, सौ. रत्नमालाताई पी भोयर माजी नगराध्यक्ष नगर परिषद मूल, संस्थेचे अध्यक्ष अविनाशजी पाल, संस्थेचे सचिव अलकाताई पाल, संस्थेचे संचालक देवानंद पाल, दीपक जवादे, नितीन पाल, शाळेचे प्राचार्य सौ ज्योती पाल (चुधरी), रोशन गावतुरे सर, प्राजक्ता म्याम, गोलेपल्लीवार म्याम, वनकर म्याम, स्नेहा म्याम, आरती म्याम, रंजित कामटकर, तुळशीदास भुरसे, झलके बाई यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.