
” विषमतेच्या जागी समता स्थापन करावयाची आहे,अन्याय नाहीसा करून न्याय नांदवावयाचा आहे, सर्वत्र बंधुभावाची वृद्धि करावयाची आहे, फुसक्या तडजोडीवर भरवसा ठेवून तत्वाचा भंग होऊ देणे आम्हाला पसंत नाही. आमच्या आक्षेपकांना मुळी प्रगतीच नको आहे.
त्यांना धर्माच्या नावाखाली अन्याय, जुलूम, विषमता व फाटाफूट ही समाजात कायम ठेवायची आहेत.
अर्थातच प्रगतीची थोडीजरी चळवळ झाली तरी ते ‘क्रांती’,’ क्रांति’ असा कोलाहल करतात.
बहिष्कृतांनी आपले माणुसकीचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी किंचित जरी हालचाल केली,तरी त्यांचा अमानुष छळ करण्यास हे सोवळे धर्माभिमानी म्हणविणारे लोक कमी करत नाही.”!!!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-२०, पान नं.१८२.)
दि. १५ नोव्हेंबर १९२९ रोजी “बहिष्कृत भारत “मध्ये प्रकाशित झालेला बाबासाहेबांचा लेख.