प्रितम जनबंधु
संपादक
आरमोरी:- आरमोरी येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज DNRS परिवार व टायगर टीम आरमोरी तर्फे रबर वृक्ष देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
आरमोरी पोलीस ठाण्याला पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झाल्या पासून समाज सेवेचे व्रत हाती घेऊन तळागाळात जाऊन कायदेविषयक सेवा व समाज सुव्यवस्था स्थापन करून आरमोरी परिसरात नाव लौकीक मिळविले आहे. आज तालुक्यातील प्रत्येक गावातील छोट्या मोठ्या कार्यक्रमात प्रामुख्याने हजेरी लावुन पोलीस व सामान्य जनता यांच्यात दुवा साधून मार्गदर्शन करणे व पोलिसाप्रती असलेली आत्मीयता जोपासुन सामान्य लोकांच्या मनातील भीती घालवण्याचे काम श्री मनोज काळबांडे यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कार्यप्रणालीतून प्रकट केली आहे.
शुभेच्छा देतांना DNRS परिवाराचे राजकुमार दहिकार, ऋषी सहारे, रुपेश बारापात्रे व टायगर टीम आरमोरी सदस्य या वेळी उपस्थित होते.