युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
भारतीय संविधानाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संसदेत संविधानावर चर्चा घडवून आणणे ही बाब देशाच्या दृष्टीने चांगली आहे.
मात्र संविधानाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना खुद्द देशाचे गृहमंत्री यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संसदेमध्ये आंबेडकर नावाला वारंवार आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणण्यापेक्षा भगवानाचे नाव घेतले असते तर स्वर्ग प्राप्त झाला असता अशाप्रकारे बाबासाहेबांबद्दल अनुद्गगार काढून देशाच्या घटनाकाराला अपमानीत करण्याचा जो प्रयत्न गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून जाणीवपूर्वक केल्या गेला आहे.
ही बाब देशाकरिता अत्यंत गंभिर व दुर्दैवाची अशी आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशातील तमाम देशवासीयांचा देखील अपमान झालेला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या या बेताल वक्तव्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून त्यांनी विनम्रपणे देशाची जाहीर माफी मागावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी केली आहे.
अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ दिनांक 20 डिसेंबर शुक्रवार रोजी विदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसिलदारांमार्फत पंतप्रधानाच्या नावाने निवेदन सादर करून अमित शहा यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याबाबतचे निवेदने सादर केल्या जाणार असल्याचेही चरणदास इंगोले यांनी म्हटले आहे.