शिवणपायली अपघात प्रकरणात ट्रॅक्टरटाली मालक,चालक व मजूरांचा पिसिआर घेण्याची गरज… — कुमार लखन अंबादास पोईनकरच्या मृतदेहाची ट्रॅक्टर चालकासह मजूरांनी केली हेळसांड… — चिमूर पोलिस अपघात प्रकरणाची योग्य दिशेनी तपास करणार काय?.. — भाग – ३…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

          कुमार लखन अंबादास पोईनकर हा १७ डिसेंबरच्या पहाटे सुमीत पालकदास बोरकर यांच्या ट्रॅक्टरटालीवर अवैध वाळू उपसा करण्यासाठी गेला असता त्याचा वाळू भरलेल्या ट्रॅक्टर टाली वरुन खाली पडून मृत्यू झाला.

        कुमार लखन ट्रॅक्टरटाली वरुन खाली पडल्याने मागच्या चक्क्यात दबल्यामुळे त्याचा अपघात स्थळीच मृत्यू झाला असल्याची खात्री पुर्वक माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

       ज्या जागेवर लखनचा मृत्यू झाला त्या जागेवरुन त्याचा मृत्यूदेह इतरेत्र ठिकाणी हलविण्यात आला व सदर ट्रॅक्टरटाली मधील वाळू अनभिज्ञ जागी टाकण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

         ट्रॅक्टर टाली मालकाच्या सुचनेनुसार कुमार लखन अंबादास पोईनकर चा मृतदेह हा घटनास्थळावरून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टरटाली चालक व मजूरांद्वारे हलविण्यात आलाय व त्याच्या मृतदेहाची हेळसांड करण्यात आली.

        ट्रॅक्टर टाली मधील वाळू सुध्दा अनभिज्ञ ठिकाणी टाकण्यात आली.याच बरोबर लखनचा टोप,टाॅवेल आणि चप्पल चिखली जवळ टाकण्यात आले.

       ट्रॅक्टर टाली मालक हा भाजपासी संबंधित असल्याने खलबते घोटून अपघात प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी सत्ता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले असल्याची शंका सुध्दा नातेवाईकांना आहे.

         ज्या ठिकाणी कुमार लखन अंबादास पोईनकर चा अपघात झाला होता त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता.असे असताना,अपघाताची माहिती चिमूर पोलिसांना ट्रॅक्टरटाली चालकाने व मजूरांनी का म्हणून दिली नाही?हा अपघात घटनेमागचा प्रकारच गंभीर दिसतो आहे.

        तद्वतच अपघात घटनेनंतर सिमेंटच्या विटा दुलाई करण्यासाठी ट्रॅक्टर टाली पाठविण्यात आल्याचा बहाना ट्रॅक्टर मालकाकडून पुढे आणला जात असल्याचे लोक चर्चेवरून दिसून येते आहे.

        कुमार लखन अंबादास पोईनकर याच्या अपघात घटनेचा वास्तव घटनाक्रम सख्या नातेवाईकांना लागलीच न सांगता त्याचा मृतदेह हा चिमूर उपजिल्हा रुग्णालयात का म्हणून हलविण्यात आला,हे एक कोडेच आहे.

        म्हणूनच कुमार लखन अंबादास पोईनकर अपघात घटनेचा तपास हा सखोल आणि चिकित्सक पद्धतीने होणे गरजेचे आहे.

       तद्वच अपघात घटनेची संपूर्ण सत्य माहिती उघड करण्यासाठी ट्रॅक्टर टाली मालक सुमीत पालकदास बोरकर,ट्रॅक्टर चालक चंद्रशेखर नारायण तुमराम आणि घटनाक्रमातील इतर मजूरांना अटक करुन त्यांचा पिसिआर घेण आवश्यक असल्याचे घटनाक्रम सांगतो आहे.