प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत १७ डिसेंबर २०२४ रोज मंगळवारला अपमान करणारे उपोरोक्त वक्तव्य राज्यसभेत केले होते.
मुंबईच्या सभेत आज केंद्रीय गृहमंत्र्याच्या वक्तव्याचा व भाजपाच्या काळ्याकुट्ट इतिहासाचा खरपूस समाचार घेत केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी जाहिरपणे केली तथा लावून धरली.
काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पडले.परंतू तुम्ही सुद्धा १९५२ मध्ये मध्य मुंबईतून डाव्यासोबत आर.एस.एस.नी मिळून हरवलय.तुमच चारित्र्य डागाळलेल असताना दुसऱ्यांना तुम्ही बोलू शकत नाही.
तर का म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस,डाव्या पक्षांनी आणि आर.एस.एस.नी पाडले,तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की काश्मिर मध्ये जे सैनिक घुसले आहेत,त्या पुर्ण सैनिकांना ताब्यात घेतले पाहिजे,तुम्ही पुर्ण सैनिक ताब्यात घेतले नाही तर पुढे चालून भयानक परिणाम भोगावे लागतील असा इशारा बाबासाहेबांनी दिला होता.(आज परिणाम भोगावे लागत आहेत.)
भाजपाला अडीच वर्ष कारागृहात राहिलेला व तळीपार असलेला केंद्रीय गृहमंत्री चालतोय.कुठल्या परिस्थिती मध्ये तुम्ही आहात.
नरेंद्र मोदींना आव्हान आहे तुम्ही संविधान प्रेमी आहात तर जस्टिस लोहीया यांचा अंत कसा झालाय? कुणी केला? कशासाठी केला? हे तरी सांगा…
महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा सविधानामध्ये झाली असताना आर.एस.एस.च्या महिला स्वयंसेवीकेंनी दिल्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयराज घरावर सतत ५ दिवस मोर्चा काढला होता.तुम्ही डागाळलेल्या चारित्र्याचे असताना दुसऱ्यावर बोलताय? ते वाईट आम्ही स्वच्छ,ते काळे आम्ही पांढरे,हे चालणार नाही, आम्ही तुमचा सर्व इतिहास बाहेर काढू…
काँग्रेसला जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत द्या,आम्हाला काही फरक पडत नाही.परंतू तुमचे डागाळलेल चारित्र्य स्वच्छ होणार आहे काय?
कांग्रेसनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केले तुम्हीही केले,तुमच्या खिशात विरोधी पक्षनेते असतील,विरोधी पक्षातील नेते असतील,मी नाही.
नऊ वेळा माझ्यावर ईडीची चौकशी लागली.एक आफिसर आला आणि म्हणाला प्रकाशराव काही तरी सांगा,मी म्हणालो हे माझ्या आजोबांचे घर आहे व बाहेर बसलेले लोक मला जेवन देतात,बाकी माझ्याजवळ काही नाही.
भाजपचे लोक द्वेषाचे बिज पेरतात यामुळे मनीपूर पेटलय,चंबंल घडलय,इतर राज्य पेटत आहेत,तुम्हचे चारित्र्य सुध्दा धुमीळ झालेले आहे.
अमीत शाहच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर आहोत,रस्ता आमच्या बापाचा आहे,सर्व रस्ते भरुन असतील,दोनचार दिवस वाट बघू…
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सन्मानानेच बोलावे लागेल.अन्यथा सर्वांचे चारित्र्य बाहेर काढू?
(वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील सभेचा मनोगतातील सारांश.)