युवराज डोंगरे – खल्लार
उपसंपादक
मौजा नांदरुन शेत शिवारात शेतीचे काम करीत असताना शेतकऱ्यांवर रानडुक्करांने हल्ला करून जखमी केले असल्याची घटना (१९) आज सकाळच्या सुमारास घडली.
श्री.नाशोक बापुराव पवार (५३) हे त्यांच्या शेतातील कपाशी पिकांतून रानडुक्कर हकालत असतांना त्यांच्या मागून अचानकपणे रानडुक्कर आले व त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जखमी केले.
जखमीस पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रानडुकराच्या व इतर वन्य प्राण्यांच्या वाढत्या संख्येने शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला असून शेतातील पिके नष्ट करणे,शेतकऱ्यांवर हल्ला करणे अशा अनेक प्रकारचे नुकसान रानडुकरापासून होत असून वन विभागाने याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.