दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या विशेष सहकार्याने वार्षिक रिंगण आयोजित तरुणांमध्ये संत विचारांचा जागर करण्यासाठी रिंगण वक्तृत्व स्पर्धा २०२३ संत विचारांवर आधारित पहिली आणि एकमेव राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन हभप डॉ.नारायण महाराज जाधव यांनी केले तर बक्षिस वितरण समारंभ संपादक राजीव खांडेकर, दत्तात्रय बाळसराफ, संस्थेचे विशाल तांबे, खजिनदार मयुर ढमाले, रिंगणचे संपादक सचिन परब, परीक्षक नंदन रहाने, निलेश चव्हाण यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
रिंगण वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रृती बोरस्ते, द्वितीय क्रमांक इरफान शेख, तृतीय क्रमांक यश पाटील, चतुर्थ क्रमांक पराग बद्रिके, पाचवा क्रमांक तेजस पाटील यांनी पटकावला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक अमोल गोळे, आदित्य देशमुख, अभय आळसी यांना देण्यात आला. यावेळी रिंगण वकृत्व स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक, रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र वितरण करण्यात आले.
आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळत असली तरी एखाद्या विषयावर थेट बोलण्याची संधी तशी कमीच मिळते.या तरुण पिढीमधून उत्तम वक्ते घडावेत, त्यांना संत साहित्यावर आपले विचार मांडण्याचे व्यासपीठ मिळावे यासाठी रिंगण वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती असे रिंगणचे सचिन परब यांनी सांगितले आहे.