बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शहाजी धोंडिबा शिंदे (बेलवाडी) यांचा महाराष्ट्र राज्य डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडी बद्दल इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे मंगळवारी (दि.19) सत्कार करण्यात आला.
शहाजीअण्णा शिंदे हे दूधगंगा सहकारी दूध संघ इंदापूरचे माजी चेअरमन आहेत. डेअरी असोसिएशनच्या पुणे येथे दि. 12 डिसें. रोजी झालेल्या बैठकीत शहाजीराव शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहाजीअण्णा शिंदे यांच्या आजपर्यंतच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे दुग्ध व्यवसायास होईल, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले. यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार, सहकार महर्षी शंकरराव मोहित पाटील कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश मेहेर, विजय पवार, संजय पवार, अरविंद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.