कॅन्सर तपासणी शिबीरात संशयास्पद निघालेले रुग्ण पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना… — विजयकिरण फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम…

 

    सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी

         राज्याचे विरोधी पक्षनेते,माजी मंत्री व सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्रातील पहिले टेलिमेडिसिन २.५ कोटी रुपयांची कॅन्सर तपासणी फिरते हॉस्पिटल गाडी आणण्यात आली,या माध्यमातून सावली तालुकातील नागरिकांची २ टप्यात कॅन्सर तपासणी करण्यात आली होती.

          सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीनजी गोहने व तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांच्या नेतृत्वात कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शिबिराचे आयोजन सावलि तालुक्यात विविध ठिकाणी १६ शिबिरात करण्यात आले.महाराष्ट्रातील ग्रामीण,आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी वस्तीत राहणारे उपेक्षित आणि वंचित कुटुंब जे आर्थिक स्थितीमुळे कर्करोग तपासणी करू शकत नाही अश्या कुटुंबांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

         स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल.उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे. 

          सावली तालुक्यातील कॅन्सर तपासणी शिबीरात संशयास्पद निघालेले रुग्णांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल, नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर केले होते ह्या रुग्णांना जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम व राहुल मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे उपचार सुरू असून कर्करोगाचे वेळीच निदान होऊन वेळीच त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. याकरिता संशयास्पद असलेल्या कर्करोग रुग्णांनी विजयभाऊ वडेट्टीवार व सावली तालुका काँग्रेस कमिटीचे आभार मानले आहेत.