“सावधान,!”रास्त(स्वस्त)धान्य दुकानाच्या तांदळात प्लॅस्टिकचा तांदूळ मिश्र…. — करोडो विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता.. — खतरनाक साजीश दिसतोय..

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादिका 

            महाराष्ट्र राज्यासह अख्या भारत देशात पर नागरिकांमागे ३ किलो तांदूळ व २ किलो गहू फुकट दिल्या जात आहे.तसेच अंत्योदय लाभार्थी कुटुंबांना दरमहा ३५ किलो तांदूळ व गहू दिला जातो आहे.

             रोजगार न देता,फुकट धान्य देण्याची योजना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून राबविण्यात येत आहे.या विभागातंर्गत ३ किलो तांदूळ व २ किलो गहू पर नागरिकांमागे मदत म्हणून दिले जात असले तरी देशातील नागरिकांना मानसिक गुलाम व बौद्धिक लाचार करणारी कार्यपध्दत असल्याचे अभ्यासू व जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे.

असे दिसतात प्लॅस्टिकचे तांदूळ..

              मात्र,अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रास्त भाव दुकानाद्वारे वाटप करण्यात येणाऱ्या तांदूळात प्लॅस्टिकचा तांदूळ कमी प्रमाणात मिश्रीत करून प्रत्येक तालुक्यात पुरवठा केला जातो आहे.हाच तांदूळ सर्व रास्त भाव धान्य दुकानाच्या माध्यमातून ग्राहकांना (लाभार्थ्यांना)वाटण्यात येत असल्याने प्लॅस्टिकचा तांदूळ मिश्रीत करून वाटण्यामागे शासनाचे आणि पुरवठादार कंत्राटदारांचे नेमके काय मनसुबे आहेत?याचा उलगडा होणे आवश्यक आहे.

             अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शासकीय-खाजगी वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांना व शासकीय निवासी आश्रमशाळा,मान्यताप्राप्त निवासी आश्रमशाळा यांना तांदूळ पुरवठा केला जातो आहे.

असे दिसतात पाण्यात तरंगणारे प्लॅस्टिकचे तांदूळ..

         याचबरोबर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व पुर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार म्हणून मध्यान्ह भोजनात कंत्राटदारांनी पुरवठा केलेल्या याच तांदूळांचा उपयोग केला जातो आहे.

             प्लास्टिक तांदूळाच्या पुरवठ्यामुळे देशातील करोडो विद्यार्थ्यांचे व करोडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची संभावना नाकारता येत नाही.तद्वतच प्लास्टिकच्या तांदूळात नेमके असते तरी काय? याबाबत शंकाकुशंकाना पेव फुटले आहेत.

            मात्र,प्लास्टिक मिश्रीत तांदूळ का म्हणून पुरवठा केला जातो आणि अशा पध्दतीचा तांदूळ वाटप करण्यामागचे उदेश काय आहेत?हे शोधून काढले पाहिजे व दोषी असलेल्या सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई केली पाहिजे.