खड्याने बसला फेकले शेतात.. — जिवितहानी नाही.. — डॉ.सतीश वारजूकर घटनास्थळावर दाखल..

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका

    शंकरपूर ते कान्पा राष्ट्रीय राजमहामार्गाची खास्ता हालत झाली असताना या मार्गाच्या मजबूतीकरणाकडे बांधकाम विभाग व इतर विभागांचे दुर्लक्ष होत आहे.

      यामुळे या राष्ट्रीय राजमहामार्गावरुन प्रवाशांना प्रवास करणे तारेवरची कसरत करावी लागत आहे.

        आज तर चिमूर आगारातंर्गत एसटी महामंडळाची बस चिमूर ते कान्पा सकाळ फेरी मार्गक्रमण करीत असतांना रस्त्यावरील खड्डे चुकविताना शेतात उतरली असल्याची धक्कादायक घटना घडली.

         सुदैवाने कुणाचीही जिवितहानी झाली नाही.या बसमध्ये विद्यार्थी प्रवास करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

          या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे संयोजक डॉ.सतीश वारजूकर हे घटना स्थळावर दाखल झाले व त्यांनी चिमूर ते कान्पा राष्ट्रीय राजमहामार्गाच्या रास्ता बांधकामासाठी रास्तारोको आंदोलन सुरू केले.