
बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे पिरसाहेब बाबांच्या पावन भूमीत सालाबाद प्रमाणे श्री गुरु दत्त जयंती निमित्त ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या सौजन्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान अकरावे वंशज श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर मळवली यांचा आशीर्वाद व श्री गुरु सोहम महाराज देहूकर यांच्या उपस्थिती मध्ये बुधवार दिनांक 20 /12 /2023 रोजी सकाळी 8 वाजता व्यासपीठ व विना पूजन होऊन अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे.
दररोज नित्यनेमाने सकाळी काकडा आरती गाथा भजन हरिपाठ भोजन व संध्याकाळी 6 ते 8 भोजन, 8 ते 10 किर्तन नंतर हरिजागर करून नामाचा जयघोष करून भरगच्च कार्यक्रमाने सप्ताहाला सुरुवात होणार आहे. सप्ताहासाठी, समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक आजी, माजी ,सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व वारकरी आणि भाविक भक्त यांच्या प्रयत्नातून सप्ताहाला प्रारंभ होणार आहे.
सर्व भागातील भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने नामाचा रस घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे आसे पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या व भाविकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.