डॉ.जगदिश वेन्नम 

     संपादक 

   सतिश कडार्ला, 

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

मुंबई, दि. १९: नक्षल्यांना घाबरून गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक विकास थांबवता येणार नाही अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला आहे या महत्वाच्या बाबी कडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले..

       विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.विधानसभा सदस्य श्री. धर्मरावबाबा आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार,सदस्य दिलीप वळसे पाटील,नाना पटोले,जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता. 

    यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड स्टील प्रकल्पामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असून कोनसरी येथील प्रकल्प उभारल्यानंतर दहा हजार जणांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

          विधानसभा सदस्य श्री.धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही,अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com